इंडिया दर्पण वृत्तसेवा
मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले आमरण उपोषण मागे घेतले असून त्यांनी उपोषण सोडत असतांना आज पुन्हा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. मी उपोषण सोडलं असलं तरी साखळी उपोषण सुरुच राहणार आहे. दोन दिवसात चर्चा करुन पुढची दिशा ठरवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
उपोषणा सोडतांना ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा अंतरवली सराटी सारखी लाठीचार्जची घटना घडवून आणायचा होता. त्यांना राज्यात दंगल घडवायची होती. पण, मी तसं होण्यापासून वाचवलं असेही मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.
मनोज जरांगे पाटील आता आपल्या डॅाक्टरांच्या सल्ल्यानुसार उपाचार घेणार आहे.