इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
कोलकात्ताः संदेशखळी प्रकरणात कोलकाता उच्च न्यायालयाने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकारवर ताशेरे ओढले. तृणमूल काँग्रेसचे वजनदार नेते नेते शाहजहान शेख यांना तात्काळ अटक करावी, असे न्यायालयाने म्हटले आहे.
संदेशखळी येथील महिलांनी आरोप केला आहे, की शाहजहान शेख आणि त्याचे गुंड त्यांचे शोषण करायचे आणि त्यांची जमीन जबरदस्तीने हडप करायचे. त्याच्या लपण्यासाठी पोहोचलेल्या ‘ईडी च्या पथकावर हल्ला झाल्यापासून शाहजहान शेख फरार आहे. शाहजहान याने दाखल केलेल्या याचिकेत अटकेला स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली होती. ती उच्च न्यायालयाने फेटाळली आहे.
कोलकाता उच्च न्यायालयाने संदेशखळी प्रकरणाची दखल घेत सुनावणी सुरू केली. त्याच वेळी, न्यायमूर्तींनी तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी आणि पश्चिम बंगालच्या इतर दोन मंत्र्यांच्या टिप्पण्यांवरदेखील कठोर भूमिका घेतली.