मंगळवार, डिसेंबर 30, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

राज ठाकरे यांच्या निवासस्थानी दादा भुसे यांनी घेतली त्यांची भेट…..या विषयावर झाली चर्चा

ऑक्टोबर 13, 2023 | 12:40 pm
in संमिश्र वार्ता
0
Untitled 51


इंडिया दर्पण ऑनलाई डेस्क
मुंबई – मुंबई एंट्री पॉईंटवरची प्रस्तावित टोलवाढ आणि एकूणच टोलबद्दलची लोकांच्या मनात असलेल्या तक्रारी, राग आहे त्याला वाचा फोडण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन टोलबाबत चर्चा केली. या बैठकीत मंत्री दादा भुसे होते. आज सकाळी दादा भुसे यांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी भेट घेऊन या विषयावर सविस्तर चर्चा केली.

त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली, ९ वर्षांपूर्वी याच विषयावर आम्ही तात्कालीन मुख्यमंत्र्यांशी बोललो होतो; तेंव्हाच लक्षात आलं होतं की सरकारने टोल कंपन्यांशी केलेले करार होते जे २०२६ पर्यंत आहेत. ह्यातले बरेचसे करार २००० साली झाली आहेत आणि ते बँकांशी झालेले करार आहेत. ह्या करारात अनेक चुका त्यावेळेला झाल्या; ज्या सुविधा देऊ असं करारात म्हणलं गेलं त्या सुविधा दिल्या गेलेल्या नाहीत. टोल भरायचा पण रस्ते खराब आहेत अशा परिस्थितीत टोल का भरायचा हा प्रश्न लोकांच्या मनात आहे.

त्याचवेळी मुंबई एंट्री पॉईंटवरती टोलवाढ झाली आणि हा विषयाला पुन्हा वाचा फुटली. माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी उपोषण सुरु केलं, ते मागे घेऊन आम्ही मुख्यमंत्र्यांशी बोलायचं ठरवलं. आणि नेमकं त्यावेळेला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांनी चारचाकी वाहनांना टोल माफ आहेच असं सांगितलं. मग जर टोलमाफ आहे तर तो इतकी वर्ष का घेतला गेला हे आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी विचारायला सुरुवात केली आणि त्यातून काही ठिकाणी संघर्ष झाला

आज १३ ऑक्टोबर २०२३ रोजी ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी जी बैठक झाली, त्यात काय सुधारणा व्हायला हव्यात ह्यावर चर्चा झाली.
त्याचा तपशील खालीलप्रमाणे राज ठाकरे यांनी दिला आहे.

  • टोल नक्की किती जमा होत आहे, दररोज किती गाड्या टोलनाक्यावरून जातात ह्याचा खरा आकडा नक्की काय आहे? ह्याबद्दल सरकार आणि टोल कंपन्या ह्यांचं जनतेप्रती उत्तरदायित्व आहे. ह्याबद्दलची पारदर्शकता हवीच
  • त्यामुळे पुढचे पंधरा दिवस सरकारकडून आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून कॅमेरे लावले जातील. जेणेकरून नक्की किती गाड्यांची ये-जा होते ह्याची मोजदाद केली जाईल. गाड्यांची संख्या वाढत असताना टोल पण वाढणार असेल तर हे चालणार नाही. त्यामुळे किती गाड्या नक्की जातात आणि नक्की किती टोल जमा होतो हे कळलंच पाहिजे
  • करारात नमूद केलेल्या सर्व सोयीसुविधा ह्या मिळाल्याच पाहिजेत. स्वच्छ प्रसाधनगृह, प्रथमोचार सेवा, रुग्णवाहिका, क्रेन, प्रकाशयंत्रणा, पोलीस अंमलदार, करारपत्रं, शासननिर्णय प्रत, आणि टोलबद्दलच्या तक्रारींसाठी मंत्रालयात एक कक्ष, ह्या सुविधा तात्काळ केल्या जातील
  • करारातील नमूद सर्व उड्डाणपूल आणि भुयारीमार्ग ह्यांचं डीटेल्ड ऑडिट केलं जाईल. आणि हे ऑडिट आयआयटीच्या लोकांकडून केलं जाईल
  • ठाण्यात झालेली टोलवाढ मागे घेण्यासाठी सरकारला एक महिन्याची मुदत दिली गेली आहे.
  • प्रत्येक टोलनाक्यावर जी पिवळी रेषा आहे, त्या पिवळ्या रेषेच्या ३०० मीटरच्या पलीकडे जर गाड्यांची रांग गेली तर त्या रेषेच्या पलीकडच्या सगळ्या गाड्या टोल न घेता सोडून दिल्या जातील.
  • ४ मिनिटांच्या पलीकडे एकही गाडी टोलनाक्यावर थांबणार नाही. त्याच्यासाठी अधिक पोलीस मनुष्यबळ लावलं जाईल आणि टोलनाक्यावरचे खाजगी बाऊन्सर्स काढले जातील आणि ही यंत्रणा पोलिसांकडून राबवली जाईल
  • टोल नाक्यावर फास्टटॅग चालला नाही तर एकदाच टोल घेतला जाईल. आत्ता जो दोनदा टोल घेतला जातोय तो घेतला जाणार नाही.

टोल नाक्यावर, त्या टोलचं कंत्राट किती रकमेचं आहे, टोलची वसुली किती आणि आता किती वसुली शिल्लक आहे ह्याचे डिजिटल बोर्ड दोन्ही बाजुंना असतील.

  • ठाण्याचा आनंदनगर टोलनाका, समजा ठाण्यातून निघून पुढे ऐरोलीला यायचं असेल तर दोनदा टोल भरायला लागतो तो दोनदा टोल भरायला लागणार नाही. कुठेतरी एकदाच टोल भरला जाईल. एकतर आनंदनगर किंवा ऐरोली. ह्याबाबत एक महिन्याच्या आत शासन निर्णय आणि तशा प्रकारची व्यवस्था होईल.
  • मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत असणाऱ्या हरीओमनगर रहिवाश्यांसाठी तात्काळ पूल बांधला जाईल जेणेकरून त्यांना टोल न भरता जाता येईल
  • महाराष्ट्रात रस्ते उत्तम व्हावेत ह्यासाठी राज्य सरकार, केंद्र सरकार, महानगरपालिका, नगरपालिका ह्यांच्यातील समन्वय होण्यासाठी तातडीने बैठक/बैठका होतील. जर समजा राष्ट्रीय महामार्गावर खड्डे असतील तर त्या ठिकाणचा टोल रद्द करता येतो अशी कायद्यात तरतूद आहे, त्यामुळे ह्या विषयावर पंधरा दिवसाच्या आत राज्य सरकार केंद्र सरकारशी बोलेल
  • सार्वजनिक बांधकाम विभागाचे २९ आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे १५ जुने टोल आहेत ते रद्द आहेत ते आता रद्द व्हावेत अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी आहे.
  • मुंबई एंट्री पॉईंट, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि राजीव गांधी सीलिंक ह्यांचं कॅगकडून ऑडिट व्हायला हवं अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी आहे.
  • अवजड वाहन लेन कटिंग करतात त्यांना एका महिन्याच्या आत शिस्त लावली जाईल
  • टोल प्लाझा परिसरात राहणाऱ्या नागरिकांना मासिक सवलत पास उपलब्ध करून दिले जातील
    रस्ते खराब असतील तर टोल घेतला नाही पाहिजे अशी कायद्यात तरतूद आहे, ह्याबद्दल मी स्वतः नितीन गडकरींशी बोलणार असं राज ठाकरे यांनी यावेळी सांगितलं

मुंबई एंट्री पॉईंटवरची प्रस्तावित दरवाढ आणि टोल भरून देखील रस्त्यांची असलेली दुरवस्था ह्यावर लोकांच्या मनात रोष आहे. ह्याच विषयवार ठाण्यात श्री. अविनाश जाधव आणि महाराष्ट्र सैनिकांनी आंदोलन छेडलं होतं. ह्या प्रस्तावित टोलवाढीच्या विरोधात श्री. अविनाश जाधव आणि इतर महाराष्ट्र…

— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) October 13, 2023
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

कंत्राटी २३ कनिष्ठ अभियंत्याना कायमस्वरूपी करण्याचा राज्य सरकारचा निर्णय…स्पर्धा परीक्षाची ही समिती आक्रमक

Next Post

ड्रग्ज माफिया विरोधात ठाकरे गट आक्रमक…. २० ऑक्टोंबरला नाशिकमध्ये विराट मोर्चा

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, १४ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 13, 2025
Vishwadharmi Manavta Teertha Rameshwar Rui
महत्त्वाच्या बातम्या

उध्वस्त मंदिर व मशिदीच्या जागी ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’… उद्या होणार लोकार्पण… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
sanjay raut e1697183380282

ड्रग्ज माफिया विरोधात ठाकरे गट आक्रमक…. २० ऑक्टोंबरला नाशिकमध्ये विराट मोर्चा

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011