शुक्रवार, ऑक्टोबर 10, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

नाशिकला श्री श्री १००८ प्रताप पुरी महाराज, आमदार ढिकले यांच्या हस्ते राजपूत भवनाचे भूमिपूजन

फेब्रुवारी 26, 2024 | 1:21 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20240226 WA0192 e1708933839806

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकच्या धार्मिक नगरीमध्ये राजपूत समाज बांधवांसाठी बांधण्यात येत असलेले राजपूत भवन हे राजपूत भाविकांसाठी अतिशय उपयुक्त ठरेल असे प्रतिपादन श्री श्री १००८ प्रताप पुरी महाराज यांनी केले.

श्री श्री १००८ प्रताप पुरी महाराज, आमदार राहुल ढिकले यांच्या प्रमुख उपस्थितीत बाफना वेअर हाऊस उपाध्ये कॉलेज परिसर नाशिक येथे राजपूत भवनाचे भूमिपूजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी क्षत्रिय समाज फाऊंडेशनचे अध्यक्ष भगत सिंह राठौड़, उपाध्यक्ष विनोद सिंह शेखावत, किशोर सिंह कानोड़, भामाशाह राजस्थान राजपूत परिषदेचे मुख्य रघुनाथ सिंह सुराना, राजस्थान राजपूत परिषदेचे अध्यक्ष महेंद्र सिंह राठौड़, जय नारायण विश्वविद्यालय जोधपुरचे पूर्व छात्र अध्यक्ष कुणाल सिंह भाटी, अध्यक्ष अरविंद सिंह भाटी, महाराणा एकता मंच मुंबईचे अध्यक्ष सुरेंद्र सिंह भाटी, राजेंद्र सिंह पांचाल यांच्यासह समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.

यावेळी श्री श्री १००८ प्रताप पुरी महाराज म्हणाले की, क्षत्रिय समाज फाऊंडेशन नाशिकसह परिसरात विविध सामाजिक उपक्रम राबवित आहे. त्यांचं हे कार्य समाजासाठी अतिशय महत्वाचे आहे. हे भवन उभारण्यासाठी पदाधिकारी अतिशय मेहनत घेत असून संस्थेचे या धार्मिक नगरीतील काम अतिशय कौतुकास्पद आहे असे त्यांनी सांगितले.

यावेळी आमदार राहुल ढिकले म्हणाले की, राजस्थान राजपूत समाजाच्या उपक्रमात आपला नेहमीच सहभाग असतो. संस्थेच्या वतीने नाशिक शहरात उभारण्यात येत असलेल्या या राजपूत भवनासाठी आपण आवश्यक ती मदत देऊ तसेच समाज बांधवांचे जे प्रश्न असतील ते सोडविण्यासाठी आपण कटिबध्द असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सर्व समाज बांधवांना सोबत घेऊन काम करू असे क्षत्रिय समाज फाऊंडेशनचे संस्थापक तेजपाल सिंह सोढा यांनी सांगितले.सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांवर काम करायला हवं असे महाराणा प्रताप एकता मंच मुंबईचे अध्यक्ष सुरेंद्र सिंह भाटी यांनी सांगितले.

नाशिकमध्ये राजस्थान राजपूत समाजाने केलेल्या कार्यातून राजस्थान मधील राजपूत समाजाला प्रेरणा मिळेल असे जय नारायण विश्वविद्यालयाचे अध्यक्ष अरविंद सिंह भाटी यांनी सांगितले. राजपूत समाजाच्या कार्यासाठी आपण पुढे राहून काम करू असे माजी अध्यक्ष कुणाल सिंह भाटी यांनी सांगितले. नाशिकच्या धार्मिक नगरीत आता राजपूत भवन निर्माण होत आहे या कार्यात आपले योगदान राहील असे राजस्थान राजपूत परिषद मुंबईचे अध्यक्ष महेंद्र सिंह यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले.

यांनी घेतली प्रत्येकी एक रूम बांधण्याची घेतली जबाबदारी
या प्रसंगी कैप्टन किशोर सिंह राठौड़, क्षत्रिय समाज फाउंडेशनचे उपाध्यक्ष विनोद सिंह शेखावत, वरिष्ठ सल्लागार रंजीत सिंह चुंडावत, दयाल सिंह चौहान, तेजपाल सिंह शेखावत, गोविंद सिंह जादौन, राजस्थान राजपूत परिषद मुंबई यांच्या वतीने प्रत्येकी एक रूम बांधण्याची जबाबदारी घेण्यात आली. या प्रसंगी राजस्थान राजपूत परिषदेचे अध्यक्ष महेंद्र सिंह यांच्यासह सर्व दात्यांचा श्री श्री १००८ प्रताप पुरी महाराज यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राज्यातील स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी आणि तक्रार नोंदविण्यासाठी आता १०४ टोल फ्री हेल्पलाईन…

Next Post

मराठवाड्यातील तीन जिल्हयात इंटरनेट सेवा बंद…जरांगे पाटील यांचे तीन साथीदार पोलिसांच्या ताब्यात

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा १० ऑक्टोबरचा दिवस… जाणून घ्या शुक्रवारचे राशिभविष्य

ऑक्टोबर 10, 2025
notes
मुख्य बातमी

बँकांकडे तब्बल १६३ कोटी रुपयांच्या ठेवी पडून… त्यात तुमची तर नाही ना? फक्त हे करा, लगेच मिळतील पैसे…

ऑक्टोबर 10, 2025
mahavitarn
स्थानिक बातम्या

७ वीज कर्मचारी संघटनांचा संप, वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज, ‘मेस्मा’ लागू

ऑक्टोबर 9, 2025
rape2
क्राईम डायरी

अल्पवयीन मुलीवर बलात्कार…गुन्हा दाखल

ऑक्टोबर 9, 2025
crime1
क्राईम डायरी

कॉलेजरोड कंपनीचे शोरूम फोडून पावणे सतरा लाखाच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

ऑक्टोबर 9, 2025
cbi
संमिश्र वार्ता

लाचखोरी प्रकरणात सीबीआयने मुंबईतील सीजीएसटी अधीक्षक आणि निरीक्षकांना केली अटक

ऑक्टोबर 9, 2025
girish mahajan
महत्त्वाच्या बातम्या

खऱ्या अर्थाने संकटमोचक… हा निर्णय घेणारे गिरीश महाजन राज्यातील पहिलेच मंत्री… अन्य मंत्रीही आदर्श घेणार?

ऑक्टोबर 9, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या ९ ऑक्टोबरचे राशिभविष्य

ऑक्टोबर 9, 2025
Next Post
manoj jarange e1706288769516

मराठवाड्यातील तीन जिल्हयात इंटरनेट सेवा बंद…जरांगे पाटील यांचे तीन साथीदार पोलिसांच्या ताब्यात

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011