येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येवला-कोपरगाव मार्गावर म्हसोबचा माथा जवळ मध्यरात्रीच्या सुमारास ट्रक व स्विफ्ट कार यांच्यात भीषण अपघात झाला.
या अपघातात दोन्ही गाड्यांमध्ये जोरदार धडक झाली. त्यात कार चालक ठार झाला. मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला असून स्विफ्ट कारचा चुराडा झाला.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहचले. त्यांनी या अपघाताचा पंचनामा करुन पुढील कारवाई सुरु केली.