इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
चंदीगडः माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांचा पक्ष ‘इंडियन नॅशनल लोकदला’चे प्रदेशाध्यक्ष नफे सिंग राठी यांच्यावर काही लोकांनी केलेल्या गोळीबारात राठी आणि त्यांचा एक सुरक्षा कर्मचारी ठार झाला. दोन सुरक्षा कर्मचारी जखमी झाले.
राठी गाडीच्या पुढील सीटवर बसले होते. त्यांच्या मानेवर आणि कमरेला गोळ्या लागल्या. ‘इंडियन नॅशनल लोकदला’चे मीडिया सेल प्रभारी राकेश सिहाग आणि आमदार अभय चौटाला यांनी राठी यांच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला. सुरक्षा कर्मचाऱ्यांवर ब्रह्मशक्ती संजीवनी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी गुन्हे अन्वेषण एजन्सी (सीआयए) आणि स्पेशल टास्क फोर्स (एसटीएफ) तैनात करण्यात आले आहेत.
या हल्ल्यामागे गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि त्याचा जवळचा सहकारी कला जाठेदी याचा हात असल्याची शक्यता आहे. प्राथमिक तपासात मालमत्तेचा वाद हे या हत्येमागचे कारण असल्याचे समजते.