इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
लखनऊःकौशांबी येथील फटाक्यांच्या कारखान्याला लागलेल्या आगीनंतर मोठा स्फोट होऊन मालकासह नऊ जण ठार झाले. झाला. या अपघातात चौघे गंभीर जखमी झाले असून कारखान्यात १३ जण अडकल्याची भीती आहे.
या कारखान्यात २४ जण काम करत होते. आगीनंतर झालेल्या स्फोटाची तीव्रता इतकी होती, की घटनास्थळापासून पाचशे मीटर अंतरावर काम करणाऱ्या कामगारांचे मृतदेह जाऊन पडले. कारखान्याच्या आजूबाजूच्या घरांनाही आग लागली. कामगार १५ फूट उडून कारखान्याच्या बाहेर पडले.
हा कारखाना एक ते दीड बिघा जमिनीवर होता, असे गावातील लोकांनी सांगितले. आजूबाजूच्या गावातील सुमारे दोन डझन लोक येथे काम करीत होते. या कारखान्याचे नाव न्यू रंगोली फटाका असे होते. कारखान्यापासून शंभर मीटर अंतरावर खासगी शाळा आहे; परंतु रविवार असल्याने शाळा बंद असल्याने मोठी दुर्घटना टळली.