इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केल्यामुळे राजकीय वर्तूळात खळबळ निर्माण झाली आहे. मझ्यावर सलाईनमधून विष प्रयोग करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगत त्यांनी हा बामणी कावा आता चालणार नाही असे सांगितले. त्यामुळे या आरोपावरुन जोरदार प्रतिक्रिया आता उमटू लागल्या आहे. यावेळी त्यांनी मला संपवायचे असेल तर मीच सागर बंगल्यावर येतो. मला मारून टाका असे आव्हानही फडणवीस यांना दिले.
मराठा आंदोलक जरांगे पाटील यांची समजूत घालण्याचा प्रयत्न सुरु आहे. तर दुसरीकडे या आरोपांमुळे भाजपचे नेते सुध्दा संताप व्यक्त करत आहे. भाजप नेत्यांनी सागर बंगल्यावर जाण्यासाठी आधी आमची भिंत पार करावी लागेल असा इशारा दिला आहे. तर आमदार नितेश राणे यांनीही जरांगे पाटील यांना आव्हान दिलंय. आंदोलन नेमकं कशासाठी आहे? मराठा समाजासाठी आहे की फडणवीस यांना बदनाम करण्यासाठी आहे? असा प्रश्न उपस्थिती केला आहे. भाजप आमदार प्रसाद लाड यांनीही जरांगे पाटील आता हे दुकान बंद करा असे म्हटले आहे.
देवेंद्र फडणवीस यांचा बामणी म्हणून उल्लेख केल्यामुळे पुण्यातील हिंदू महासभाही आक्रमक झाली आहे. हिंदू महासभेचे आनंद दवे यांनी जरांगे विकृत होत चालले आहेत अशी टीका केली आहे. तर दुसरीकडे संभाजी ब्रिगेडने आरक्षण द्यायचंच नाही हा बामणी कावा आज मनोज जरांगेंच्या माध्यमातून महाराष्ट्रात समोर जाहीर झाल्याचे म्हटले आहे.