नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ठेंगोडा येथून आज कांदा रथाला सुरुवात झाली. शेतकरी व्यंगचित्रकार किरण मोरे व केशव सूर्यवंशी यांनी आयोजन केलेल्या या रथाची सुरुवात ठेंगोडा येथील प्रसिध्द सिध्दीविनायक गणपती मंदीरा पासून सुरु झाली.
केंद्र सरकारने कांद्याची निर्यात बंदी केल्याने कांद्याच्या दरात घसरण झाली आणि त्यामुळे शेतक-यांचा उत्पादन खर्च निघणे मुश्कील झाल्याने शेतकरी मेटाकुटीला आला.
कांद्यावर होणारा खर्च व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कांद्यावर दिलेली आश्वसासन याची आठवण करुन देण्यासाठी कांदा रथ निघाला असून बागलाण तालूक्यात विविध गावात हा रथ कांदा उत्पादक शेतक-यांची जनजागृती करणार आहे.