नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शासनाच्या महात्मा ज्योतिराव जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत ऑपरेशन करून दिल्याच्या मोबदल्यात ७ हजार रुपयाची लाच घेतल्याप्रकरणी पिंपळगाव बसवंत येथील धन्वंतरी हॅास्पिटल्याचे दोन डॅाक्टर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले. या दोन्ही डॅाक्टरांविरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कायद्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईबाबत एसीबीने दिलेली माहिती अशी की, तक्रारदाराची आई यांचा हात फ्रॅक्चर झाला असल्याने त्यांना धन्वंतरी हॉस्पिटल पिंपळगाव येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते त्यांचे शासनाच्या महात्मा ज्योतिराव जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत ऑपरेशन करून दिल्याच्या मोबदल्यात आरोपी डॉक्टर महेश प्रल्हाद परदेशी यांनी तक्रारदार यांच्याशी संभाषणा दरम्यान पंच साक्षीदार यांच्या समक्ष 7000/-रुपये लाचेची मागणी केली. सदर संभाषणादरम्यान तिथे उपस्थित असलेल्या आरोपी क्रमांक डॉक्टर महेश रामविलास बुब यांनी आरोपी क्रमांक डॅा. परदेशी यास लाचेची मागणी करण्याकरिता प्रोत्साहन दिले. तसेच डॉक्टर महेश प्रल्हाद परदेशी, यांनी सदर लाचेची रक्कम पंचसाक्षीदार यांच्या समक्ष स्वीकारली असता त्यांना रंगेहात पकडण्यात आले असून आरोपींविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, सन 1988 चे कलम 7 व कलम 12 प्रमाणे गुन्हा दाखल कामकाज सुरु आहे.
- यशस्वी सापळा कारवाई*
युनिट – ला.प्र.वि. नाशिक
तक्रारदार- पुरुष, 44 वर्ष. - आरोपी *- डॉक्टर महेश प्रल्हाद परदेशी, वय- 40 वर्षे, मेडिकल डायरेक्टर धन्वंतरी हॉस्पिटल पिंपळगाव तालुका निफाड जिल्हा नाशिक
- डॉक्टर महेश रामविलास बुब व 51 वर्ष मेडिकल डायरेक्टर धन्वंतरी हॉस्पिटल पिंपळगाव तालुका निफाड जिल्हा नाशिक
*लाचेची मागणी- दिनांक 23/02/2024 रोजी 7,000/- रु.
*लाच स्वीकारली – दिनांक 23/02/2024 रोजी 7,000/- रु.
*लाचेचे कारण – यातील तक्रारदाराची आई यांचा हात फ्रॅक्चर झाला असल्याने त्यांना धन्वंतरी हॉस्पिटल पिंपळगाव येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते त्यांचे शासनाच्या महात्मा ज्योतिराव जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत ऑपरेशन करून दिल्याच्या मोबदल्यात आरोपी क्रमांक 1 यांनी तक्रारदार यांच्याशी संभाषणा दरम्यान पंच साक्षीदार यांच्या समक्ष 7000/-रुपये लाचेची मागणी केली. सदर संभाषणादरम्यान तिथे उपस्थित असलेल्या आरोपी क्रमांक 2 यांनी आरोपी क्रमांक 1 यास लाचेची मागणी करण्याकरिता प्रोत्साहन दिले.तसेच आरोपी क्रमांक 1 यांनी सदर लाचेची रक्कम पंचसाक्षीदार यांच्या समक्ष स्वीकारली असता त्यांना रंगेहात पकडण्यात आले असून आरोपींविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, सन 1988 चे कलम 7 व कलम 12 प्रमाणे गुन्हा दाखल कामकाज सुरु आहे.
*सापळा अधिकारी – मीरा आदमाने, पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक
सह सापळा अधिकारी – गायत्री जाधव पोलीस निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक.
*सापळा पथक-पोहवा/ पंकज पळशीकर, पोना/ प्रमोद चव्हाणके, चालक पोना /परशुराम जाधव सर्व नेमणूक ला.प्र.वि. नाशिक