अक्षय कोठावदे, पिंपळनेर
साक्री विधानसभा मतदार संघातील १०१ वर्षापुर्वी स्थापन झालेल्या पिंपळनेर या ग्रामपंचायतीचे आज नगरपरिषदेत रुपांतर झाले असून तसे महाराष्ट्र शासनाचे राजपत्र २२ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रसिद्ध झाले. पिंपळनेर ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेत रुपांतर व्हावे म्हणून सातत्याने प्रयत्न् आमदार मंजुळाताई गावित आणि डॉ. तुळशिराम गावीत करीत होते. ३ वर्षाच्या प्रयत्नांना आज यश प्राप्त झालेले आहे. पिंपळनेर वासियांना संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त् मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांनी आज सप्रेम भेट दिली आहे.
पिंपळनेर शहराची वाढती लोकसंख्या, नविन होत असलेल्या वसाहती यांना ग्रामपंचायत मुलभूत सुविधा म्हणजेच रस्ते, लाईट, पिण्याचे पाणी, आरोग्य् सेवा पुरवु शकत नव्हती. नगरपरिषद झाल्याने या सुविधा पुरविणे शक्य होणार असल्याची माहिती आमदार मंजुळाताई गावित यांनी दिली आहे. स्थानिक रहिवाशीयांची, लोकप्रितिनिधींची ग्रामपंचायत सरपंच व सदस्य्, व्यापारी संघटना यांची गेल्या अनेक वर्षापासूनच्या मागणीस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मान्यतेचे आदेश शासनाने पारित केले आहेत.
पिंपळनेर ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेत रुपांतर व्हावे म्हणून गावित यांनी तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे दि.27-9-2021 रोजी प्रथम प्रस्ताव दिला. या प्रस्तावात ग्रामपंचायतीचा ग्रामसभेचा ठराव, पंचायत समिती साक्रीचा ठराव, जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा ठराव, भूमी अभिलेख साक्री यांचेकडून आवश्य्क असलेला पिंपळनेरचा गाव नकाशा नगर भूमापन हद्दीत येणारे सर्व्हे / गट नं. यांची माहिती, ग्रामपंचायतीची लोकसंख्या, नगरपरिषद स्थापना करण्यास आवश्य्क असलेले ना हरकत प्रमाणपत्र, अकृषीक रोजगाराची टक्केवारी, मा.जिल्हाधिकारी यांचे स्वयंस्पष्ट् अभिप्राय, कागदपत्रांची जुळवाजुळव करुन धुळे जिल्हाचे नव नियुक्त् मा. जिल्हाधिकारी श्री गोयल यांचे स्वयंस्पष्ट् अभिप्राय इ. कागदपत्रांचे अडथळे यांचे सतत पाठपुरावा करुन प्राप्त् करुन घेतले आणि दि. 23/8/2023 रोजी परिपुर्ण प्रस्ताव नाशिक विभागाचे आयुक्त् यांचे मार्फत मा. मुख्यमंत्री आणि नगरविकास विभागाचे म. उपसचिव यांचेकडे समक्ष सादर केला. आणि आज १०१ वर्षापुर्वी स्थापन झालेल्या पिंपळनेर ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेत रुपांतर करण्याचा प्रस्ताव मा. मुख्यमंत्री यांनी मंजूर केला आहे.
१०१ वर्षापुर्वी स्थापन झालेल्या ग्रामपंचायतीचे नगर परिषदेत रुपांतर झाल्याने हद्दवाढ होईल,रस्ते,पुल,मोऱ्या, पथदिवे,पिण्याच्या पाण्याची सोय इ. कामांसाठी विकासाचे दालन खुले होणार असल्याची प्रतिक्रीया शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ. तुळशिराम गावित यांनी व्यक्त् केली असून हे सारे श्रेय आमदार सौ. मंजुळाताई गावित यांचे आहे. नगरपरिषदेच्या विकास कामांसाठी मा. मुख्यमंत्री यांच्याकडून भरघोस निधी उपलब्ध् करुन घेऊ व पिंपळनेर शहराच्या विकासात वाढ होणार आहे.
१०१ वर्षापुर्वीच्या पिंपळनेर ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेत रुपांतर होण्यासाठी मा.जिल्हाधिकारी अभिनव गोयल व त्यांचे सर्व सहकारी तसेच पिंपळनेर ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, साक्री तालुक्यातील सर्व अधिकारी, मंत्रालयातील उपसचिव, प्रधान सचिव, मुख्यमंत्री कार्यालयातील सर्व अधिकारी वृंद आणि मा.मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे आमदार सौ. मंजुळाताई तुळशिराम गावित व शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ. तुळशिराम गावित यांनी पिंपळनेर ग्रामस्थांच्या वतीने जाहीर आभार मानले आहेत.