नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – माकप नेते जीवा पांडू गावीत यांच्या नेतृत्वाखाली नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर ध़डक मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून जिल्ह्यातील सुरगाणा,पेठ,नांदगाव,चांदवड.मालेगाव,देवळा,कळवण तालूक्यातील माकप,किसान सभेच्या कार्यकर्त्यांचा पायी लॉंग मार्च ठिकठिकाणाहून निघाला आहे. मुंबई लॉंग मार्च वेळी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनांची थट्टा केली असून त्याच्या निषेर्धात हा जिल्हा भरातील ठिकठिकाणाहून कार्यकर्त्यांचे लाल वादळ नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर २६ फेब्रुवारी रोजी धडकणार आहे.
कांदा निर्यातबंदी उठवावी,कांद्याला दोन रुपये आधार भाव ध्यावा,वनजमीनी नावावर कराव्या,फॉरेस्ट प्लॉट धारकांचा स्वतंत्र सातबारा बनवावा,शबरी घरकुल योजनेची अंमलबजावणी करावी अशा प्रमुख मागण्यांसाठी हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते नाशिकच्या दिशेने निघाले आहे.