इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
इस्त्रायलमध्ये अडकलेल्या २१२ भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणण्यात य़श आले आहे. भारत सरकारने यासाठी ऑपरेशन अजय ही मोहिम सुरु केली आहे. परराष्ट्र मंत्री ए. जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या या मोहिमेतून पहिले विमान आज सकाळी भारतात उतरले आहे.
इस्त्रायल व हमास यांच्यात सुरु असलेल्या युध्दात अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी ही मोहिम आहे. इस्त्रायलमध्ये १८ हजाराहून अधिक भारतीय लोक आहे. त्यांना आणण्यासाठी ही मोहिम सुरु राहणार आहे.
मायदेशी पहिले विमान आल्यानंतर त्याची माहिती परराष्ट्र मंत्री ए.जयशंकर यांनी व्टीटव्दारे दिली आहे.