इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला निवडणूक आयोगाने तुतारीवाला माणूस हे चिन्ह दिले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार असे नाव दिले होतं. आता चिन्ह दिल्यामुळे शरद पवार गट आता या चिन्हावर निवडणूक लढवणार आहे.
शरद पवार गटाने वटवृक्ष हे चिन्ह मागितल्याची चार्च होती; परंतु निवडणूक आयोगाने तुतारीवाला माणूस हे चिन्ह दिले आहे. उलट हे चिन्हच आता पवार यांच्या पक्षात बळ भरायला कारणीभूत ठरेल, असा दावा केला जात आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हे अजित पवार यांना दिल्यामुळे शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाचे पुढचे निर्देश येईपर्यंत तुतारीवाला माणूस हेच शरद पवार गटाचे पक्षाचे चिन्ह राहील.
शरद पवार यांना मिळालेले नाव आणि तुतारीवाला माणूस हे चिन्ह कायम राहू शकते. शरद पवार गट न्यायालयात जाऊन आपल्याला मिळालेलं नाव आणि चिन्ह कायम ठेवण्याची मागणी करण्याची शक्यता आहे.