येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील शनी पटांगणातील एका दुकानात साप शिरत असल्याच लक्षात येताच स्थानिकांची गर्दी झाली. मात्र सापाला पकडण्याच कोणी धाडस करु शकले नाही. पण, त्याच वेळी तेथील शूजच्या दुकानात शूज घेण्यासाठी आलेल्या ज्योती जाधव या महिलेने एक प्लास्टिक बरणी मागवत त्या सापाला त्यात जेरबंद केले.
ज्योती जाधव यांनी केलेल्या या धाडसामुळे उपस्थित स्थानिकांनी टाळ्या वाजवत त्यांच्या धाड़साचे कौतुक केले. बरणीत जेरबंद झालेल्या सापाला सर्पमित्र दिपक सोनवणे यांच्या स्वाधीन करण्यात आले. त्यानंतर सापाला त्याच्या अधिवासात सोडून देण्यात आले.