इंडिया दर्पण ऑनालाईन डेस्क
मुंबई – पनवेलच शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार विवेकानंद शंकर पाटील यांच्यावर ईडीने कारवाई करतत १५२ कोटीच्या मालमत्ता जप्त केली आहे. या मालमत्तेमध्ये भूखंड, बंगला तसेच रहिवाशी संकुलाचा समावेश आहे. पाटील हे चार वेळा आमदार राहिलेले आहे. या कारवाईने राजकीय वर्तूळात खळबळ निर्माण झाली आहे.
कर्नाळा नागरी सहकारी बँकेचे विवेकानंद पाटील हे माजी अध्यक्ष होते. याच बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. या घोटाळ्याप्रकरणातच पाटील यांची १५२ कोटींच्या मालेमत्तेवर तात्पुरती जप्त करण्याची कारवाई ईडीने केली आहे.
त्याचप्रमाणे ईडीने विवेकानंद पाटील यांच्या कर्नाळा महिला रेडीमेड गारमेंट्स कॉर्पोरेटिव्ह सोसायटी लिमिटेड या मालमत्तेचा देखील समावेश केला आहे. आतापर्यंत बँकेच्या या प्रकरणात ३८६ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. कर्नाळा बँकेत ६५० कोटी रुपयांचा घोटाळा झाला होता. या घोटाळ्याचे आरोप विवेकानंद पाटील व त्यांच्या सहका-यावर होते. २००८ साली हा घोटाळा उजेडात आला.
ईडीने या कारवाईबाबत सांगितले की, शेतकरी कामगार पक्षाचे चार वेळा आमदार असलेले विवेकानंद शंकर पाटील, पनवेलचे कर्नाळा नागरी सहकारी बँक लिमिटेडचे माजी अध्यक्ष, त्यांचे नातेवाईक आणि कर्नाळा महिला रेडीमेड गारमेंट्स को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड यांच्या मालकीची स्थावर मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे. १२ ऑक्टोंबर २०२३ रोजी बँक फसवणूक प्रकरणाच्या संदर्भात विस्तीर्ण जमीन, बंगला, निवासी संकुल इत्यादींच्या स्वरूपात १५२ कोटी (अंदाजे) आहे. या प्रकरणात एकूण जप्त केलली मालमत्ता ३८६ कोटी आहे.