शुक्रवार, जुलै 4, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

केंद्र सरकारने सहकार क्षेत्रासाठी घेतलेल्या या उपक्रमांचे पंतप्रधानांच्या हस्ते उदघाटन व पायाभरणी

by India Darpan
फेब्रुवारी 22, 2024 | 8:41 pm
in राष्ट्रीय
0
modi 111

नवी दिल्‍ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) –पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीत भारत मंडपम येथे २४ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी साडेदहा वाजता सहकार क्षेत्रासाठी अनेक महत्त्वाच्या उपक्रमांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. देशातील सहकार क्षेत्राच्या बळकटीकरणाच्या दिशेने टाकलेले हे एक मोठे पाऊल असेल. ११ राज्यांतील ११ प्राथमिक कृषी पतसंस्था (पॅक्स) मध्ये राबवल्या जाणाऱ्या ‘सहकारी क्षेत्रातील जगातील सर्वात मोठ्या धान्य साठवणूक योजने’च्या पथदर्शी प्रकल्पाचे पंतप्रधान उद्घाटन करणार आहेत.

या उपक्रमांतर्गत गोदामे आणि इतर कृषी पायाभूत सुविधांच्या बांधकामासाठी देशभरात अतिरिक्त ५०० पॅक्ससाठी पायाभरणीही पंतप्रधान करणार आहेत. पॅक्स गोदामांना अन्नधान्य पुरवठा साखळीसह सुलभपणे जोडणे, अन्न सुरक्षा मजबूत करणे तसेच नाबार्ड आणि राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ (एनसीडीसी) यांच्या सहकार्याने देशातील आर्थिक विकासाला चालना देणे हे या उपक्रमाचं उद्दिष्ट आहे. कृषी पायाभूत सुविधा निधी (एआयएफ), कृषी विपणन पायाभूत सुविधा (एएमआय) अशा विविध विद्यमान योजना एकत्रित करून हा उपक्रम राबवला जात आहे.

सहकार क्षेत्राला नवसंजीवनी देणे तसेच लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांचे सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने “सहकार से समृद्धी” या सरकारच्या संकल्पनेला अनुसरून, देशभरातील १८ हजार पॅक्समधील संगणकीकरणाच्या प्रकल्पाचे पंतप्रधान उद्घाटन करतील.

या प्रकल्पाला २५०० कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चासह मंजुरी मिळाली आहे. या उपक्रमामध्ये सर्व कार्यान्वित पॅक्सना युनिफाइड एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग (ईआरपी) आधारित राष्ट्रीय सॉफ्टवेअर, अखंड एकीकरण आणि कनेक्टिव्हिटी उपलब्ध आहे. राज्य सहकारी बँका आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांद्वारे या पॅक्सना नाबार्डशी जोडून, पॅक्सची कार्यक्षमता वाढवणे आणि प्रशासनात सुधारणा करणे हा या उपक्रमाचा हेतू आहे. याचा लाभ कोट्यवधी लहान आणि अल्पसुधारक शेतकऱ्यांना होईल. नाबार्डने या प्रकल्पासाठी राष्ट्रीय स्तरावर सॉफ्टवेअर विकसित केले आहे. हे सॉफ्टवेअर देशभरातील पॅक्सच्या विविध गरजा पूर्ण करेल. इआरपी सॉफ्टवेअरवर १८ हजार पॅक्सची नोंदणी पूर्ण झाली आहे. हा प्रकल्पाच्या अंमलबजावणीतील एक महत्त्वाचा टप्पा आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

खून करून मयतानेच स्वतः गळफास घेतला आहे असा बनाव करणा-या आरोपीस जन्मठेपेची शिक्षा

Next Post

या व्यक्तींना आर्थिक लाभाची संधी…जाणून घ्या, शुक्रवार, २३ फेब्रुवारीचे राशिभविष्य

India Darpan

Next Post
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना आर्थिक लाभाची संधी…जाणून घ्या, शुक्रवार, २३ फेब्रुवारीचे राशिभविष्य

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी संयमाने आणि चिकाटीने मार्ग काढावा, जाणून घ्या, शुक्रवार, ४ जूलैचे राशिभविष्य

जुलै 3, 2025
Vidhanparishad prashnottare 04 1024x512 1

नदी शुद्धीकरण प्रकल्पासाठी तीन टप्प्यांत काम सुरू…विधानपरिषदेत मंत्री उदय सामंत यांची माहिती

जुलै 3, 2025
doctor

आता धर्मादाय रुग्णालयांत या योजना बंधनकारक….तक्रारींचे निराकरण करण्यासाठी देखरेख समिती

जुलै 3, 2025
Vidhan Sabha New 5 750x375 1

राज्यात १२,८०० थॅलेसेमिया रुग्ण, निकृष्ट गोळ्यांची चौकशी, चाचणी सक्तीची…ठाकरे यांच्या मागणीनंतर मंत्रींचं आश्वासन

जुलै 3, 2025
Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011