इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
लातूर – शहरात गुन्हेगारीच्या अनेक घटना घडतात, अशा घटनांना लगेच वाचा फुटते, त्या संदर्भात बातम्या देखील सोशल मीडिया तथा वृत्तपत्रे यामध्ये ठळकपणे प्रसिद्धी मिळते. आजच्या काळात अनैतिक संबंधांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली दिसून येते, असे म्हणणे धाडसाचे ठरत असले तरी यात वास्तववादी सत्य आहे, हेही तितकेच खरे…कारण गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये शहरी भागात तथा ग्रामीण परिसर येथे पती-पत्नीच्या नात्यांमध्ये दुरावा निर्माण होऊन अन्यत्र अनैतिक संबंध निर्माण झाल्याच्या घटना अनेक अनेकदा उघड होतात. त्यातच मग या गुप्त प्रेम संबंधांमध्ये अडसर ठरणाऱ्या जोडीदाराचा काटा काढण्याचा प्रकार देखील घडतो. यामध्ये समाज कोणत्या स्तराला चालला आहे ? याची चिंता केवळ समाजशास्त्रज्ञ, समाजअभ्यासक आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी करून चालणार नाही, तर ही सर्वच समाजातील घटकांची जबाबदारी आहे, असे म्हणावे लागेल. मराठवाड्यासारख्या मागास भागात लातूर मधील औसा तालुक्यातील ग्रामीण भागात अशीच एक घटना घडली.
त्याच्यावर लोखंडी रॉडने केला हल्ला
या प्रकरणामध्ये रिक्षाचालक असलेल्या पतीची फसवणूक करून त्याच्या पत्नीचे एका गॅरेजवाल्यासोबत अनैतिक संबंध होते. अर्थात या गॅरेजवाल्यांनीच त्या महिलेचा गैरफायदा घेतला, मात्र जेव्हा या अनैतिक प्रकाराची कुणकुण त्या गरीब बिचाऱ्या रिक्षावाल्याला लागली, तेव्हा त्याने यासंदर्भात पत्नीला विचारणा सुरू केली. त्यामुळे आपल्या प्रेम संबंधात अडथळा ठरत असल्याचे पाहून त्याच्या पत्नीने आणि तिच्या प्रियकराने म्हणजेच गॅरेजवाल्याने रिक्षा चालकाचा काटा काढण्याचे ठरवले. आणि त्या गॅरेजवाल्याने रिक्षा चालकाला गोड बोलून बाहेरगावी नेत निर्जन ठिकाणी त्याच्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला. मात्र पोलिसांना हा प्रकार कळतच त्यांनी तातडीने आरोपींना अटक केली, आता या प्रकरणाची केवळ औसा तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण लातूर जिल्ह्यात चर्चा सुरू आहे.
असे झाले अनैतिक प्रेम
इस्माईल मणियार हा ऑटोरिक्षा चालवून उदरनिर्वाह करत होता. मयत हा ऑटोची सर्व्हिसिंग आरोपी आशपाक युसूफ शेख यांच्या गॅरेजमध्ये आपल्या रिक्षा दुरूस्तीचे काम करण्यासाठी देत होता. वारंवार सर्व्हिसिंग करत असल्याने दोघांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध निर्माण झाले. यातूनच रिक्षाचालक ईस्माईल मणियार याची पत्नी व गॅरेजवाला अशफाक यांच्या अनैतिक प्रेमाचे संबंध निर्माण झाले होते.