नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – प्रत्येक व्यक्तीमध्ये काही तरी सुप्त गुण असतात. त्यांच्यातल्या सुप्त गुणांचा वापर करण्यासाठी त्यांना कुणीतरी पुढे होवून प्रोत्साहन दिले पाहिजे असे मत पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र ऊर्फ राजूभाई रमणलाल गुजराथी यांनी व्यक्त केले. येथील महालक्ष्मी मध्यवर्ती मंडळ, नाशिक आयोजित समाजभुषण व जीवनगौरव पुरस्कार – २०२४ या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे पदावरून बोलत होते. त्यांच्या हस्ते समाजभुषण आणि जीवनगौरव पुरस्कांराचे वितरण करण्यात आले.
सामाजिक भान जपून कार्य करीत असलेल्या समाजातील व्यक्तींच्या पाठीवर शाबासकीची थाप देण्यासाठी असे कार्यक्रम होण्याची आवश्यकता असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमात सर्वश्री. अच्युत नारायण गुजराथी, (नाशिक) प्रदिप मदनलाल गुजराथी, (मनमाड) सौ.माधवी गुजराथी – शाह, (नवसारी), दिपक चंद्रकांत पाटोदकर (येवला), मनिष रघुनाथ गुजराथी (सिन्नर), सौ.वसुधा हेमंत गुजराथी (नाशिक) आणि डॉ.विजया बिपीन गुजराथी (पुणे) यांना समाजभुषण पुरस्कार देवून गौरविण्यात आले तर सर्वश्री डॉ.संजय मोहनलाल मालवी (इंदौर), डॉ.श्री किरण बद्रीनाथ गुजराथी (अर्थे ता शिरपूर), डॉ.प्रताप मुरलीधर गुजराथी (मनमाड), सौ.सुरेखा सुरेश नवसारीकर (नाशिक) आणि प्रा.सुरेश रघुनाथ गुजराथी (राजगुरूनगर) यांना जीवनगौरव पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. रोख रक्कम, सम्मानचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्कांराचे स्वरून होते. जागतिक बुध्दिबळपटू विदीत गुजराथी यास समाजरत्न पुरस्कार देण्यात येत असल्याची घोषणा डॉ डी एम गुजराथी यांनी केली कार्यक्रमाची सुरूवात सौ.संध्या गुजराथी, सिमा गुजराथी, सुचेता गुजराथी आणि प्रिया नवसारीकर यांच्या स्वागतगीताने झाली. मंडळाचे अध्यक्ष श्री.सी.जे गुजराथी यांनी त्यांच्या प्रास्ताविकपर भाषणात मंडळाच्या सामाजिक कार्याचा आढावा घेतला.
श्री दसा श्रीमाळी वैष्णव गुजराथी समाजातील समाजबांधवांसाठी सामाजिक कार्य करण्याचा संकल्प हाती घेवून श्री महालक्ष्मी मध्यवर्ती मंडळ ही विश्वस्त संस्था कार्यरत असून या संस्थेतर्फे आयोजित पुरस्कार सोहळ्याला महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेले समाजबांधव सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ.डी.एम.गुजराथी आणि जगदीश देवरे यांनी केले. प्रा सुरेशभाई, माधवी गुजराथी शाह व आनंद नवसारीकर यांनी याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले.संस्थेचे सचिव श्री राजाभाई गुजराथी यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विश्वस्त सर्वश्री हेमंत गुजराथी, दिलीप गुजराथी, उज्वल नवसारीकर आणि समीर गुजराथी व नियोजन समिती सदस्यांनी प्रयत्न केले.