मंगळवार, जून 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक जिल्हा पेट्रोल डीलर्स वेल्फेअर असोसिएशनच्या अध्यक्षपदी विजय ठाकरे यांची निवड

by India Darpan
फेब्रुवारी 22, 2024 | 4:34 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20240222 WA0263

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक जिल्हा पेट्रोल डीलर्स वेल्फेअर असोसिएशन ही नाशिक जिल्ह्यातील पेट्रोल पंप डीलर्सची नोंदणीकृत संघटना आहे .या संघटनेची विशेष सर्वसाधारण सभा बुधवारी गीता लॉन्स गंगापूर येथे श्री भूषण भोसले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. जिल्ह्यातील सर्व ऑइल कंपन्यांचे पेट्रोल पंप डीलर्स या सभेला उपस्थित होते. या सभेला विशेष अतिथी म्हणून राष्ट्रीय तसेच राज्य संघटनेचे अध्यक्ष उदय लोध, राष्ट्रीय संघटनेचे सचिव के. सुरेश कुमार, राज्याचे सचिव अमित गुप्ता हे उपस्थित होते.

या सभेमध्ये उदय लोध, अमित गुप्ता, सागर रूकारी, सीए शुभम छाजेड यांनी पेट्रोल पंप चालवताना घ्यावयाची विविध बाबींमधील व स्तरांवरील काळजी व उपाय यावर मार्गदर्शन केले. विशेष बाब म्हणून संघटनेचे सदस्य हेमंत धात्रक व भूषण भोसले यांचा सन्मानपत्र देऊन सभागृहातर्फे गौरव करण्यात आला. पेट्रोल पंपाला लागणाऱ्या व पूरक असणाऱ्या विविध वस्तू व सेवांचे स्टॉल या सभागृहाच्या सभेच्या ठिकाणी लावण्यात आलेले होते. या विशेष वार्षिक सभेमध्ये विविध ठराव करण्यात आले. मागील वार्षिक सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले.

कार्यकारणी संख्या वाढवण्याचा घटना दुरुस्तीचा निर्णय घेण्यात आला. बायोडिझेल व अवैध डिझेल यांची बेकायदेशीर विक्री जर कुठे होताना आढळल्यास त्याद्वारे संघटना कायदेशीर मार्गांचा अवलंब करून अटकाव करेल असाही ठराव करण्यात आला .टँकरद्वारे डिझेल पेट्रोलची वाहतूक होत असताना होणाऱ्या चोरीच्या घटनांना आवर घालण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचाही ठराव करण्यात आला. नवीन पंपाला परवानगी देताना राष्ट्रीय हरित लवादाने दिलेल्या निवासी क्षेत्रापासून ५० मीटर अंतर असावे या बाबीचे उल्लंघन प्रशासनाकडून सतत होत असल्याने त्याबाबतीत प्रशासनाला पुन्हा एकदा याची जाणीव करून देणे व त्यासंबंधी खबरदारी न घेतल्यास प्रसंगी कायदेशीर मार्गांचा देखील अवलंबन करणे असाही ठराव मंजूर करण्यात आला. डीलर मार्जिन संदर्भात केंद्रीय संघटनांच्या बैठकीमध्ये ऑइल कंपन्यांकडून योग्य ते निर्णय घेतले नाही तर केंद्राने व राज्याने पुकारलेल्या आंदोलनात सहभागी होण्याचा ठराव एक मुखाने मंजूर करण्यात आला. सध्याच्या कार्यकारिणीची मुदत ही २०२४ मध्ये संपत असल्याने सर्वानुमते नूतन कार्यकारणीची निवड करण्यात आली.

नाशिक जिल्हा पेट्रोल डीलर्स वेल्फेअर
असोसिएशन नूतन कार्यकारणी

अध्यक्ष:- श्री.विजय ठाकरे
उपाध्यक्ष :– श्री.दिनेश धात्रक ,श्री. राजेश पाटील ,श्री.तेहसिन खान, सचीव :- श्री. अमोल बनकर, सहसचीव :- श्री. मनोज चांडक, खजिनदार :- श्री. सुदर्शन पाटील, सहखजिनदार:- श्री.निलेश भंदुरे सदस्य :- श्री.राजेंद्र चव्हाणके,श्री. शरद गुंजाळ, श्री.संजय धोंडगे, श्री. नरेश कुलथे, श्री.अनिल कातकाडे, श्री.दत्तराज छाजेड, श्री.सुरज पवार, श्री. हेमचंद्र मोरे, श्री.सचिन काठे, श्री. दिपक पिंगळे, श्री. सचिन हंडोरे, श्री. अभिजित निपुंगे , श्री.प्रमोद राठोड.

सभेनंतर राष्ट्रगीत व स्नेहभोजनाने सभेची सांगता झाली. सभेच्या यशस्वीतेसाठी संस्थापक अध्यक्ष श्री.नितीन धात्रक , साहेबराव महाले, समीर कपूर , रवी ठाकरे सचिन निकम ,मयूर ढोकणे, प्रवीण महाजन,स्नेहा पुली सर्वांनी परिश्रम घेतले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आरोग्य विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात २६ विद्यार्थ्यांना पीएच.डी., १११ गुणवंत विद्यार्थ्यांना १३९ सुवर्णपदक प्रदान होणार

Next Post

नाशिकला महालक्ष्‍मी मध्‍यवर्ती मंडळातर्फे यांना मिळाला समाजभुषण व जीवनगौरव पुरस्‍कार

Next Post
IMG 20240222 WA0266 1 e1708600288390

नाशिकला महालक्ष्‍मी मध्‍यवर्ती मंडळातर्फे यांना मिळाला समाजभुषण व जीवनगौरव पुरस्‍कार

ताज्या बातम्या

जिल्हा परिषदेमार्फत होणाऱ्या कामांच्या गुणवत्तेसाठी 2 1024x682 1

जिल्हा परिषदेमार्फत होणाऱ्या कामांच्या गुणवत्तेसाठी लवकरच क्वॉलिटी कंट्रोल धोरण….

जून 3, 2025
Hon CM Japan Deligation Meeting 4 1024x406 1

तीन भूखंडांच्या भाडेपट्ट्यातून मिळाले ३ हजार ८४० कोटी ४९ लाख; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांना वाटपपत्र

जून 3, 2025
Untitled 6

धक्कादायक…एनसीईआरटीच्या २० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या पायरेटेड पाठ्यपुस्तकांची निर्मिती…

जून 3, 2025
GscFSVjaQAAtzfC

आयपीएल ट्रॉफीच्या अंतिम सामन्यावर पावसाचे सावट…पावसामुळे सामना न झाल्यास कोणाला ट्रॅाफी?

जून 3, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना आर्थिक लाभाच्या संधी, जाणून घ्या, बुधवार, ३ जूनचे राशिभविष्य

जून 3, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील नोंदणीची मुदत या तारखेपर्यंत वाढवली…

जून 2, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011