नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र राज्य पेट्रोल डीलर्स संघटना (फामपेडा) यांची बैठक बुधवारी गंगापूर येथील गीता लॉन्स येथे संपन्न झाली. या बैठकीला राज्याची संपूर्ण कार्यकारणी तसेच जिल्हा संघटनांचे अध्यक्ष, सचिव व इतर पदाधिकारी उपस्थित होते. गेल्या सात वर्षापासून प्रलंबित असलेले डीलर मार्जिन कोर्ट केसेस, ऑइल कंपन्यांकडून होणारी पिळवणूक व इतर अनेक तांत्रिक बाबी यांविषयी चर्चा झाली.
सर्व राष्ट्रीय संघटना यांची ऑइल कंपन्यांच्या सोबतच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक मध्ये फामपेडाचे सदस्य जमले होते. जर ऑइल कंपनीच्या बैठकीत आपली बाजू योग्य पद्धतीने ऐकून घेतली गेली नाही व काही चुकीचा निर्णय थोपण्याचा प्रयत्न झाला. तर मोठ्या प्रमाणात आंदोलन उभे करण्याचा निर्धार या बैठकीत सर्वानुमते व्यक्त करण्यात आला.
या बैठकीला राज्य तसेच केंद्र संघटनेचे अध्यक्ष श्री उदय लोध, राज्याचे सचिव अमित गुप्ता, खजिनदार नितीन शाह ,भूषण देसाई, विजय ठाकरे ,रमेश भूत, सुरेश पाटील ,गजकुमार माणगावे, भूषण भोसले आदींसह विविध पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
नाशिक जिल्हा पेट्रोल डीलर्स वेल्फेअर असोसिएशनच्या अध्यक्षपदी विजय ठाकरे यांची निवड
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक जिल्हा पेट्रोल डीलर्स वेल्फेअर असोसिएशन ही नाशिक जिल्ह्यातील पेट्रोल पंप डीलर्सची नोंदणीकृत संघटना आहे .या संघटनेची विशेष सर्वसाधारण सभा बुधवारी गीता लॉन्स गंगापूर येथे श्री भूषण भोसले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. जिल्ह्यातील सर्व ऑइल कंपन्यांचे पेट्रोल पंप डीलर्स या सभेला उपस्थित होते. या सभेला विशेष अतिथी म्हणून राष्ट्रीय तसेच राज्य संघटनेचे अध्यक्ष उदय लोध, राष्ट्रीय संघटनेचे सचिव के. सुरेश कुमार, राज्याचे सचिव अमित गुप्ता हे उपस्थित होते.
या सभेमध्ये उदय लोध, अमित गुप्ता, सागर रूकारी, सीए शुभम छाजेड यांनी पेट्रोल पंप चालवताना घ्यावयाची विविध बाबींमधील व स्तरांवरील काळजी व उपाय यावर मार्गदर्शन केले. विशेष बाब म्हणून संघटनेचे सदस्य हेमंत धात्रक व भूषण भोसले यांचा सन्मानपत्र देऊन सभागृहातर्फे गौरव करण्यात आला. पेट्रोल पंपाला लागणाऱ्या व पूरक असणाऱ्या विविध वस्तू व सेवांचे स्टॉल या सभागृहाच्या सभेच्या ठिकाणी लावण्यात आलेले होते. या विशेष वार्षिक सभेमध्ये विविध ठराव करण्यात आले. मागील वार्षिक सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले.
कार्यकारणी संख्या वाढवण्याचा घटना दुरुस्तीचा निर्णय घेण्यात आला. बायोडिझेल व अवैध डिझेल यांची बेकायदेशीर विक्री जर कुठे होताना आढळल्यास त्याद्वारे संघटना कायदेशीर मार्गांचा अवलंब करून अटकाव करेल असाही ठराव करण्यात आला .टँकरद्वारे डिझेल पेट्रोलची वाहतूक होत असताना होणाऱ्या चोरीच्या घटनांना आवर घालण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचाही ठराव करण्यात आला. नवीन पंपाला परवानगी देताना राष्ट्रीय हरित लवादाने दिलेल्या निवासी क्षेत्रापासून ५० मीटर अंतर असावे या बाबीचे उल्लंघन प्रशासनाकडून सतत होत असल्याने त्याबाबतीत प्रशासनाला पुन्हा एकदा याची जाणीव करून देणे व त्यासंबंधी खबरदारी न घेतल्यास प्रसंगी कायदेशीर मार्गांचा देखील अवलंबन करणे असाही ठराव मंजूर करण्यात आला. डीलर मार्जिन संदर्भात केंद्रीय संघटनांच्या बैठकीमध्ये ऑइल कंपन्यांकडून योग्य ते निर्णय घेतले नाही तर केंद्राने व राज्याने पुकारलेल्या आंदोलनात सहभागी होण्याचा ठराव एक मुखाने मंजूर करण्यात आला. सध्याच्या कार्यकारिणीची मुदत ही २०२४ मध्ये संपत असल्याने सर्वानुमते नूतन कार्यकारणीची निवड करण्यात आली.
नाशिक जिल्हा पेट्रोल डीलर्स वेल्फेअर
असोसिएशन नूतन कार्यकारणी
अध्यक्ष:- श्री.विजय ठाकरे
उपाध्यक्ष :- श्री.दिनेश धात्रक ,श्री. राजेश पाटील ,श्री.तेहसिन खान, सचीव :- श्री. अमोल बनकर, सहसचीव :- श्री. मनोज चांडक, खजिनदार :- श्री. सुदर्शन पाटील, सहखजिनदार:- श्री.निलेश भंदुरे सदस्य :- श्री.राजेंद्र चव्हाणके,श्री. शरद गुंजाळ, श्री.संजय धोंडगे, श्री. नरेश कुलथे, श्री.अनिल कातकाडे, श्री.दत्तराज छाजेड, श्री.सुरज पवार, श्री. हेमचंद्र मोरे, श्री.सचिन काठे, श्री. दिपक पिंगळे, श्री. सचिन हंडोरे, श्री. अभिजित निपुंगे , श्री.प्रमोद राठोड.
सभेनंतर राष्ट्रगीत व स्नेहभोजनाने सभेची सांगता झाली. सभेच्या यशस्वीतेसाठी संस्थापक अध्यक्ष श्री.नितीन धात्रक , साहेबराव महाले, समीर कपूर , रवी ठाकरे सचिन निकम ,मयूर ढोकणे, प्रवीण महाजन,स्नेहा पुली सर्वांनी परिश्रम घेतले.