इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्लीः किमान हमी भावचा कायदा करण्याच्या मागणीसाठी शेतकरी आंदोलन करीत असताना केंद्र सरकारने उसाच्या रास्त व वाजवी किफायतशीर किंमतीत प्रतिटन अडीचशे रुपये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
सरकारने ऊस खरेदीच्या दरात आठ टक्के वाढ केली आहे. उसाच्या भावात प्रतिक्विंटल २५ रुपयांनी वाढ झाली आहे. सध्या उसाची खरेदी किंमत ३१५ रुपये प्रति क्विंटल आहे. सरकारच्या निर्णयामुळे आता दहा टक्के साखर उतारा असलेल्या उसाला किमान ३४०० रुपये प्रतिटन भाव मिळू शकेल. उसाचा खरेदी दर निश्चित करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
शेतकरी आंदोलन सुरू असताना सरकारने शेतकऱ्यांच्या बाबतीत महत्त्वपूर्ण निर्णय घेताना लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने शेतकऱ्यांना खूश करण्याचा प्रयत्न केला. दरवर्षी जून-जुलैमध्ये उसाच्या एफआरपीबाबत निर्णय घेतला जात असतो; परंतु या वर्षी तीन-चार महिने अगोदरच सरकारने उसाच्या एफआरपीबाबत हा निर्णय घेतला आहे.