वंदना वेदपाठक, इंडिया दर्पण वृत्तसेवा
बेंगलोर हे शहर भारताचे सर्वात मोठे IT- Hub तसेच हायटेक इंडस्ट्रीयल शहर म्हणून ओळखले जाते. त्यात आता बेंगळुरूमध्ये देशातील सर्वात उंच स्कायडेक लवकरच बांधण्यात येणार आहे. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी अधिकाऱ्यांना या प्रकल्पाला गती देण्याचे निर्देश दिले आहेत.
स्कायडेकचा प्रस्ताव ऑस्ट्रियन डिझाईनर फर्म कोप हिममेलब (एल) एयूने तयार केले आहे. स्कायडेकची उंची २५० मीटर असेल आणि येथून बेंगळुरू शहराचे सुंदर दृश्य दिसेल. हा देशातील सर्वात उंच व्ह्यूइंग टॉवर असेल. या भव्य स्कायडेकची रचना वटवृक्षाच्या आकारात केली जाणार आहे. त्याचा सर्वात वरचा भाग बहरलेल्या फुलाने प्रेरित असलेल्या दीपगृहासारखा असेल. याव्यतिरिक्त, त्याच्या वरच्या बाजूला असलेले विंग कॅचर असेल. स्काय डेकच्या रोलर-कोस्टर डेकवर एक सौर पॅनेल देखील स्थापित केले जाईल, जे वीज निर्माण करेल.
हे ऊर्जा-कार्यक्षम मानकांच्या आधारावर तयार केले जाईल. त्यात म्युझियम, रेस्टॉरंट आणि व्यावसायिक आस्थापनाही असतील. हा प्रकल्प सध्या प्राथमिक अवस्थेत आहे. तपशीलवार प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यासाठी सल्लागारांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतरच बांधकामाला सुरुवात होईल. या स्कायडेकच्या बांधकामामुळे बेंगळुरूला पर्यटनाच्या क्षेत्रात मोठी चालना मिळणार आहे. शहरात नवीन आकर्षण केंद्र बांधण्यात येणार आहे. बेंगळुरूची जागतिक ओळख वाढेल. बेंगळुरूमध्ये देशातील सर्वात उंच स्कायडेक बांधण्याचा प्रस्ताव शहरासाठी एक महत्त्वाकांक्षी पाऊल आहे.