नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्हयातील राज्य उत्पादन शुल्क ब विभागाच्या पथकाने एक जणाला अटक करुन अवैध दारुसह चार चाकी वाहन असा एकुण २ लाख ४२ हजार ९२० रुपये किमतीचा मुददेमाल जप्त केला आहे.
या कारवाईबाबत दिलेली माहिती अशी की, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बेलपाली रोडवरील पुलाजवळ, हरसुल शिवारात परराज्यातील मद्याची अवैधरित्या वाहतुक होणार असल्याची माहिती मिळाल्यानुसार सदर विभागाचे विभागीय उप-आयुक्त ऊषा वर्मा, जिल्हा अधीक्षक शशीकांत गजें यांचे मार्गदर्शनाखाली व विभागाचे पथकाने दारुबंदी गुन्हयाकामी वेलपाली रोडवरील पुलाजवळ, हरसुल शिवार येथे सापळा रचून संशयित वाहनांची तपासणी केली असता एक सिल्वर रंगाची अल्टो कार क्रमांक MH ४३, AB ५२७२ या वाहनामध्ये केवळ दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशात विक्रीसाठी असणारे म्हणजेच महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधीत असणारे विदेशी मदय मिळून आले.
त्यामुळे सदर वाहनाचा चालक आतिष सुरेश वाजगजे वय-३७ वर्षे, रा. हरसुल ता. त्रंबकेश्वर जि. नाशिक याचेविरुदध महाराष्ट्र दारुबंदी कायदयाचे कलमान्वये गुन्हा नोंद करुन त्यांस अटक करण्यात आली आहे. तसेच त्याच्या ताबेकब्जातुन आठ कागदी खोक्यामध्ये ठेवलेल्या ऑफीसर चॉईस ब्ल्यु व्हिस्कीच्या १८० मि.लि. क्षमतेच्या ३८४ सिलबंद काचेच्या बाटल्या ५७ हजार रुपये, सहा कागदी खोक्यामध्ये ठेवलेल्या रॉयल स्टॅग व्हिस्कीच्या १८० मि.लि. क्षमतेच्या २८८ सिलबंद बाटल्या ५१ हजार ८४० रुपये, एका कागदी खोक्यामध्ये ठेवलेल्या रॉयल चॅलेंज व्हिस्कीच्या ७५० मि.लि. क्षमतेच्या १२ सिलबंद वाटल्या ११२० रुपये, सात कागदी खोक्यामध्ये किंगफिशर बियरच्या ५०० मिली क्षमतेचे एकुण १६८ टिन रु. २४३६० तसेच सदर मदयाची अवैधरित्या वाहतुक करण्यासाठी वापरलेले वरील प्रकारचे व क्रमांकाचे चार चाकी वाहन असा एकुण रक्कम २ लाख ४२ हजार ९२० रुपये किमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क, व विभाग नाशिकचे निरीक्षक आर जे. पाटील, दुय्यम निरीक्षक प्रविण ठाकुर, धिरज जाधव सहाय्यक दुय्यम निरीक्षक विष्णु सानप जवान,संतोष कडलग, अमित गांगुर्डे, दुर्गादास बावस्कर तसेच वाहनचालक रॉकेश पगारे यांचे पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. सदरील गुन्हयाचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक प्रविण ठाकुर हे करीत आहेत.