इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मनोज जरांगे पाटील यांच्यावर अजय महाराज बारसकर यांनी गंभीर आरोप केल्यानंतर त्याला जरांगे यांनी प्रत्त्युत्तर दिले. ते म्हणाले की, हा सरकारचा ट्रॅप आहे. यात १५ ते २० जण असल्याचे सांगत त्यांनी थेट सरकारवर हल्लाबोल केला. सरकारने असे ट्रॅप लावणे बंद करावे हा त्यांचा ट्रॅप असून मला बाजूला करण्यासाठी हे सर्व एकत्र माझ्याविरोधात भिडवणार आहेत. मी जर तुकाराम महाराजांची खोटी माफी मागितली असेल तर मी भोगेन, असेही मनोज जरांगे यांनी सांगितले.
यावेळी ते म्हणाले की, माझ्यावर असे आरोप रॅलीच्या आधीच होणार होते, पण तो ट्रॅप फसला. अजय बारसकर हा बांधावरून उठला आणि महाराज झाला. तो भोंदू महाराज असून याच्या मागे कोणते नेते आणि मंत्री हे मला माहिती आहे. मी मराठा समाजासाठी कट्टर तर बारसकर हा हेकेखोर आहे. माझ्याकडून काही शब्द गेले असतील तर मी संत तुकाराम महाराजांच्या चरणी लीन होऊन माफी मागतो. बारसकर याच्या हाताने पाणी पिलो नाही असेही त्यांनी सांगितले.
यासर्व प्रकरात मुख्यमंत्री शिंदे यांचा प्रवक्ता व एकजण आहे. याला कोणी विचारत नाही, मला बदनाम करण्याचा सरकारकडून ट्रॅप आहे, अजय बारसकरने मला शिकवू नये, असे जरांगे यांनी म्हटले आहे. मला जर समाजाने बाजूला व्हायला लावले तर लगेच एक मिनिटात बाजूला होतो. मला कसलाही मोह नाही.
अजय महाराज बारसकर यांनी केले होते हे आरोप
अजय महाराज बारसकर यांनी मनोज जरांगे हा नाटकी माणूस आहे. त्याचा मिटिंग रात्री होतात. जरांगेला फक्त श्रेय हवे. जेसीबीतून फुले हवीत कार्यक्रम हवेत. असे आरोप करत जरांगेंच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यावेळी त्यांनी मुलांवरही आरोप केले. ते म्हणाले की , मुलांमध्ये इतका अहंकार का? मनोज जरांगेची मुलगी म्हणते, माझ्या बापाच्या देव पाया पडेल.