नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – खुनाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींचा इन्स्टाग्राम वरून शोध घेऊन एमआयडीसी चुंचाळे पोलिसांनी २४ तासात त्याला अटक केली. याबाबत मिळालेली माहिती अशी की, एमआयडीसी चुंचाळे पोलिस हद्दीत शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता म्हाडा वसाहती मध्ये करण कुमावत याने त्याच परिसरात राहणा-या सागर सोनार याने जुन्या भांडणाची कुरापत काढुन त्याचे मित्रांसह येऊन चाकु व विटा मारून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. एमआयडीसी पोलीस चौकी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांचे मार्गदर्शनाखाली सदर गुन्हयातील सागर सोनार यास तात्काळ अटक करून त्याचे इतर दोन साथीदार विशाल जाधव व एक विधीसंघर्षीत बालक यांचा त्यांचे इन्स्टाग्राम अकाउंट वरील फॉलोअर्स याद्वारे माहीती घेऊन सदर माहीतीची घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजशी पडताळणी करून अटक करण्यात आलेली आहे.
सदरची यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णीक, पोलीस उप आयुक्त, (परिमंडळ – २) श्रीमती मोनिका राउत, सहा.पोलीस आयुक्त, (अंबड विभाग) शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक मनोहर रामा कारंडे, पोलीस उप निरीक्षक संदिप रामदास पवार, पोशि/सुरेश जाधव, संदिप खैरनार, दिनेश नेहे, अनिल कु-हाडे, किरण सोनवणे, श्रीहरी बिराजदार, पोशि/जनार्दन ढाकणे यांनी पार पाडली.