लासलगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ३१ मार्च पर्यंत कांदा निर्यात बंदी निर्णय कायम राहणार असल्याचा खुलासा वाणिज्य विभागाच्या वतीने करण्यात आल्यानंतर सर्व शेतकरी संघटना आक्रमक झाल्या.
आज लासलगाव बाजार समितीच्या मुख्य इमारतीच्या बैठक हॉलमध्ये मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, रयत क्रांती शेतकरी संघटना,छावा क्रांती संघटना, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यासह इतर शेतकरी संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाल्या.
या बैठकीत केंद्र शासनाच्या धोरणाच्या विरोधात शेतकरी आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी बैठक संपन्न झाली. केंद्र शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत तातडीने निर्यात बंदी न हटवल्यास येणाऱ्या दिवसांमध्ये राज्यव्यापी मोठे असे तीव्र आंदोलन करणार असल्याचे निश्चित झाले.