सोमवार, जून 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

जळगावमध्ये या तारखेपासून होणार नाशिक महसूल विभागाच्या, क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा

by India Darpan
फेब्रुवारी 21, 2024 | 5:23 pm
in स्थानिक बातम्या
0
jalgaon collector

जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक महसूल विभागातील पाच जिल्ह्यातील महसूल अधिकारी, कर्मचारी यांच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा 23 फेब्रुवारी पासून छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल मध्ये होणार असून राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते 23 रोजी सकाळी 9 वाजता या स्पर्धांचे उदघाटन होणार आहे. तर राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील, राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल देसाई, राज्याचे महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

यावेळी खा. श्रीमती रक्षा खडसे, खा. उन्मेष पाटील, आ. एकनाथ खडसे, आ. किशोर दराडे, आ. सत्यजित तांबे, आ. चिमणराव पाटील, आ. संजय सावकारे, आ. शिरीष चौधरी, आ. सुरेश भोळे, आ. किशोर पाटील, आ. मंगेश चव्हाण उपस्थित राहणार आहेत. या महसूल स्पर्धा 23, 24, 25 फेब्रुवारी अशा तीन दिवस असतील.या स्पर्धेचे यजमानपद जळगाव जिल्ह्याला लाभले असून यासाठी पाच जिल्ह्यातून पाच संघ आणि एक आयुक्त कार्यालयाचा असे एकूण सहा संघ असणार आहेत. यात एकूण 14 क्रीडा प्रकार खेळले जाणार असून, त्यात सांघिक सामने 48, वैयक्तिक सामने 208 असे एकूण 256 सामने खेळले जाणार आहेत. या स्पर्धेत पुरुष खेळाडू 607 तर महिला खेळाडू 177 असे एकूण 784 खेळाडू सहभागी आहेत. यात सांस्कृतिक स्पर्धाही होणार असून त्यात गायन, वादन, अभिनय, नृत्य, निवेदन, समुहगान, नाटीका आदिचा समावेश आहे. वैयक्तिक स्पर्धेमध्ये पहिले, दुसरे, तिसरे पारितोषिक असणार आहे. तर सांघिक स्पर्धेत विजेता आणि उपविजेता निवडला जाणार आहे.
या स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, पोलीस परेड ग्राउंड व एकलव्य क्रीडा संकुलात होतील.

या स्पर्धेचा बक्षीस समारंभ रविवार दि. 25 फेब्रुवारी रोजी राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या शुभहस्ते होणार आहे. नाशिक विभागाचे आयुक्त राधाकृष्ण गमे, नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा, धुळ्याचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल, नंदुरबारचे जिल्हाधिकारी मनिषा खत्री, अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ आणि जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे या स्पर्धेचे निमंत्रक आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

येवला शहर भुयारी गटार योजनेचा मार्ग मोकळा…८२ कोटी ५ लाख रुपयांच्या निधीस मान्यता

Next Post

नाशिकला कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाच्या विरोधात सर्व शेतकरी संघटना एकटवल्या..दिला हा इशारा

Next Post
IMG 20240221 WA0289 2

नाशिकला कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाच्या विरोधात सर्व शेतकरी संघटना एकटवल्या..दिला हा इशारा

ताज्या बातम्या

IMG 20250601 WA0470

नाशिकमध्ये द्वारका सर्कल हटवण्याचे काम सुरू….मुंबईतील हाजी अलीच्या धर्तीवर सिग्नल यंत्रणा विकसित करण्याची मागणी

जून 1, 2025
Screenshot 20250601 191942 WhatsApp 1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘कॉमन मॅन- पोलीस शिल्पा’चे अनवारण संपन्न

जून 1, 2025
IMG 20250601 WA0376 1

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे उत्कृष्टता केंद्र ‘चक्र’चे भूमिपूजन आणि संकेतस्थळाचे उद्घाटन

जून 1, 2025
IMG 20250601 WA0407 1

नाशिक येथे श्री परशुराम भवन या नूतन वास्तूचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा…

जून 1, 2025
IMG 20250601 WA0356

पुण्यात पहिल्या आंतरराष्ट्रीय ॲग्री हॅकॅथॉनचे उद्घाटन…

जून 1, 2025
russia accident

रशियात रेल्वे अपघातात रेल्वे चालकासह सात जणांचा मृत्यू…३० जण जखमी

जून 1, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011