इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
आगामी काळात अजित पवार कदाचित एकटे पडतील. त्यांच्यासोबतचे नेते त्यांच्यासोबत राहतील, की नाही, याबाबत शंका अजित पवारांप्रमाणेच मुख्यमत्री एकनाथ शिंदे यांचीही स्थिती होईल, असे भाकीत करताना भाजप नेहमीच मित्रपक्षाला संपवते, अशी टीका आ. रोहित पवार यांनी केली आहे.
कर्जतमधील महाराष्ट्र केसरी बैलगाडा शर्यत समारोप समारंभात ते म्हणाले, की अजित पवार आणि त्यांच्यासोबतचे आमदार त्यांच्याविरोधातील ‘ईडी’सह अन्य यंत्रणांच्या कारवाया थांबाव्यात, म्हणून भाजपसोबत गेले आहेत. त्यामुळे भाजप त्यांना दबावात ठेवेल. विधानसभा निवडणुकीत तर दहा-वीस जागांवर त्यांची बोळवण होईल.२०२४ मध्ये हे पक्ष राहतील का, हा सर्वसामान्यांना प्रश्न पडला आहे. धमकी देऊन नेलेले आमदार आमच्यासोबत येतील, असा दावा आ. पवार यांनी केला.
राष्ट्रवादी शरद पवार गटाला काहीच मिळाले नाही पाहिजे, अशी त्यांची भूमिका आहे; पण लोकशाही व्यव्सथेत तसे होत नसते. आम्ही लढू. निवडणूक आयोगाकडे आम्ही एकच चिन्ह देणार आहोत आणि ते आम्हाला मिळेल, असा विश्वास व्यक्त करताना ते चिन्ह याआधी कोणत्याही पक्षाने वापरलेले नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. सात दिवसांत आम्हाला चिन्ह मिळेल आणि आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका आम्ही त्याच चिन्हावर आणि पक्षाच्या नावावर लढू असे त्यांनी सांगितले.