येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील कै.सुभाषचंद्र पारख पतसंस्थेच्या बाहेर बेमुदत उपोषण ठेवीदारांनी सुरु केले आहे. ही पतसंस्था अवसायानात निघाल्याने ठेवीदारांच्या ठेवी यात अडकल्या आहे.
या उपोषणाच्या वेळी पतसंस्थेच्या आजी-माजी संचालक तसेच बँकेतील भ्रष्ट कारभार करणा-या कर्मचारी-अधिकारी यांनी भ्रष्ट कारभार केल्याने त्यांच्या विरोधात कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली.
त्याचप्रमाणे बँकेत शहरासह तालुक्यातील ठेवीदारांनी ठेवलेल्या ठेवी व्याजासह तातडीने जो पर्यंत मिळत नाही तो पर्यंत पतसंस्थेच्या बाहेर ठेवीदारांनी बेमुदत आमरण उपोषण सुरु राहणार असल्याचेही सांगण्यात आले.