इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
सांगलीः शहरातील सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न कृष्णा नदीत सोडणे सांगली महापालिकेला चागलेच महागात पडले आहे. सांगली महापालिकेला नव्वद कोटी रुपयांचा दंड करण्यात आला असून ही रक्कम १५ दिवसांत भरण्याचे आदेश हरित लवादाने दिले आहेत.
स्वतंत्र भारत पक्ष तसेच जिल्हा संघर्ष समितीने याबाबत राष्ट्रीय हरित लवादाकडे जनहित याचिका केली होती. या प्रकरणात आयुक्तांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. कृष्णा नदीमध्ये २०२२ च्या जुलै आणि ऑगस्ट महिन्यात लाखो मासे मृत्युमुखी पडले होते. या प्रकरणी नदी प्रदूषणाची चौकशी करून दोषीविरूध्द कारवाईच्या मागणीसाठी हरित न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.
हरित न्यायालयाने चौकशी समिती नियुक्त करून अहवाल मागवला होता. चौकशी समितीच्या अहवालानुसार काही कारखाने आणि सांगली महापालिकेला नदी प्रदूषणास जबाबदार धरले होते. यानुसार काही कारखान्यांना दंड ठोठावण्यात आला. सुनावणीवेळी याचिकाकर्त्यांच्य वतीने अॅड. वांगीकर यांनी प्रक्रिया न करता सांडपाणी नदीत सोडले जात असल्याचे निदर्शनास आणून दिले. यावर या प्रकरणी उचित कारवाईचे निर्देश प्रदूषण मंडळाला दिले होते.