नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ब-याच वेळा डोळस माणसं सुध्दा साहसी कृत्य करण्यासाठी घाबरतात. पण, २५ टक्के दृष्टी असलेल्या सागर बोडके या तरुणाने राज्यातील ९८ गड सर केले आहे. तर १२८ दिवसात २१ वेळा महाराष्ट्रातील सर्वात उंच असलेले कळुसबाई शिखरची वारी केली आहे. त्याचबरोबर सायकलिंग करतांना सागरने टँडम सायकलने राज्यातील १२ हजार ५३१ किलो मीटरचा प्रवास केला आहे. त्यात नाशिक -पंढरपूर, मुंबई – गोवा यासारख्या वेगवेगळ्या मार्गाने त्याने हे अंतर सायकलने पार केले आहे.
याचबरोबरच सागरने स्विमिंगच्या वेगवेगळ्या प्रकारातही यश मिळवले आहे. हे सर्व साहसी गोष्टी करतांना त्यांच्या नोंदी सुध्दा त्याने ठेवल्या आहे. त्याचे रितसर लिखाण करत, त्याने ते रंजकही केले आहे. अशा सागर बोडके यांची इंडिया दर्पणचे संपादक गौतम संचेती यांनी घेतलेली ही विशेष मुलाखत….बघा युट्युवर….