नााशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्ह्यातील मोठ्या व मध्यम अशा २४ प्रकल्पांमध्ये २१ फेब्रुवारी अखेर ४४ टक्के साठा आहे. पावसाळ्यात बहुतांश धरणे ओव्हरफ्लो झाली होती. पण, काही धरणाचा पाणीसाठा कमीच होता. गेल्या पावसाळ्यापेक्षा जिल्ह्यातील धरणांचा पाणीसाठा १६ टक्के कमीच झाला होता. त्यात आता उन्हाळ्यात हा साठा ४४ टक्के झाला आहे.
फेब्रुवारी महिला जवळपास संपत आला आहे. पण, मार्च, एप्रिल व मे या तीन महिन्यासाठी हा पाणीसाठा कमीच आहे. त्यामुळे आतापासूनच पाण्याचा वापर जपून करावा यासाठी आता प्रशासनही जागे झाले आहे. राज्यातही हीच स्थिती आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणा-या गंगापूर धरणाचा साठा ६१.३७ टक्के तर समुहात ६५ टक्के साठा आहे. जिल्ह्यातील आळंदी, वाघाड, भावली, वालदेवी, भोजापूर, हरणबारी, केळझर, वाघाड यासह बहुतांश धरणे ओव्हरप्लो झाली होती. पण, आता या धरणाचा साठाही कमी झाला आहे.
जिल्ह्यात सर्वात कमी साठा भोजापूर व नागासाक्या धरणाचा आहे. भोजापूरमध्ये १६,३४ तर नागासाक्या धरणाचा साठा शून्य टक्के आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण असलेल्या गिरणा धरणाचा साठाही ३३.३७ टक्के आहे.