इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुणे पोलिसांनी अकराशे कोटी रूपयांचे अमली पदार्थ जप्त केले असून या प्रकरणी काही धागेदोरे सापडले असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. या प्रकरणातले गुन्हेगार पकडण्यासाठी संबंधीत राज्यांची मदत घेणार असल्याचे त्यांनी म्हटले. अमली पदार्थांप्रकरणी कोणतीही दिरंगाई होणार नाही असेही त्यांनी सांगितले.
ड्रग्ज पुरवठा रॅकेटमध्ये परदेशी लोकांची भूमिका समोर आली आहे आणि सर्व अपवर्ड + डाउनलोड लिंकेजसह उघडकीस येईल.
‘ड्रग फ्री पुणे’ साठी पोलिसांनी आवाहन केले आहे. बेकायदेशीर ड्रग्सचे उत्पादन, ताबा, वापर किंवा वितरण यासंबंधीची कोणतीही माहिती व्हॉट्सॲप नंबर: 8975953100 वर शेअर करा.