नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने आज दि. २० रोजी जिल्हा परिषद सेवेत असतांना मृत पावलेल्या कर्मचारी यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या उपस्थितीत समुपदेशनाने ६२ वारसांना नियुक्ती आदेश देण्यात आले.
मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मान्यता दिलेल्या अंतिम प्रतीक्षा यादीतील एकूण ७० वारसांना बोलावण्यात आले होते. तसेच यावर्षी गट ड संवर्गातून शैक्षणिक अहर्तेनुसार गट क संवर्गात समायोजनासाठी पात्र असणाऱ्या ३ गट ड कर्मचारी यांचे गट क संवर्गातील पदांवर समायोजन करण्यात आले.या संपूर्ण प्रक्रियेत १० अनुकंपा धारक वारसांनी नियुक्तीस नकार दिला. त्यानुसार आज एकुण ६२ वारसांना आज सायंकाळी ७ वाजता नियुक्ती आदेश निर्गमित करण्यात आले. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी भालचंद्र चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) वर्षा फडोळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे, कृषि विकास अधिकारी कैलास शिरसाठ, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय शिंदे, विस्तार अधिकारी शिक्षण धनंजय कोळी हे उपस्थित होते.
यामध्ये सामान्य प्रशासन अंतर्गत परिचर पदावर २८, आरोग्य विभागांतर्गत आरोग्यसेवक या पदावर १४, इवद विभागांतर्गत कनिष्ठ अभियंता या पदावर ३ स्थापत्य अभियांत्रिकी सहायक या पदावर ६, महिला व बालविकास विभागांतर्गत अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदावर १, कृषि विभागांतर्गत विस्तार अधिकारी कृषि या पदावर १, पशुसंवर्धन विभागांतर्गत पशुधन पर्यवेक्षक या पदावर १, अर्थ विभागांतर्गत वरिष्ठ सहायक लेखा या पदावर १ व कनिष्ठ सहायक लेखा या पदावर ३, शिक्षण विभागांतर्गत शिक्षण सेवक या पदावर १, ग्रामपंचायत विभागांतर्गत कंत्राटी ग्रामसेवक ३ असे असे एकूण ६२ आदेश निर्गमित करण्यात आले.
फेब्रुवारी २०२३ मध्ये १२७ पात्र अनुकंपा वारसांना अनुकंपा नियुक्ती आदेश देण्यात आले होते, याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री ना. दादाजी भुसे यांनी देखील अनुकंपा तत्वावर वारसांना नियुक्ती देण्यासंदर्भात कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. या संपूर्ण प्रक्रियेत सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली कनिष्ठ सहायक शीतल शिंदे, सरला सोनार, ज्योती गांगुर्डे, वरिष्ठ सहायक भास्कर कुवर, कानिफनाथ फडोळ, राहुल देवरे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी निवृत्ती बगड, सोनाली भार्गवे, सहायक प्रशासन अधिकारी रवींद्र आंधळे यांनी परिश्रम घेतले.
जनतेस सेवा उपलब्ध करून द्याव्या…
अनुकंपा तत्वावर नियुक्ती दिलेल्या सर्व उमेदवारांचे मी मनापासून अभिनंदन करते व प्रशासकीय सेवेत प्रवेश केल्याबाबद्दल त्यांना शुभेच्छा देते. पुढील काळात शासकीय कर्मचारी यांनी शासन नियमचे पालन करत उत्कृष्ठ कामकाज करून ग्रामीण भागातील जनतेस सेवा उपलब्ध करून द्यावा.
आशिमा मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक