नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नवीन वीज मीटर बसविण्यासाठी घरी भेट व फॉर्म मध्ये माहिती भरून देण्याच्या मोबदल्यात ७०० रुपयाची लाच स्विकारतांना विद्युत वितरण कंपनीचा कर्मचारी अनिल भास्कर आव्हाड हा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला.
या कारवाईबाबत एसीबीने सांगितले की, तक्रारदार यांचे नातेवाईक यांनी त्यांच्या घरी नवीन वीज मीटर बसविण्यासाठी म.रा.वि.वि. येवला कक्ष, येवला येथे ऑनलाइन अर्ज केला होता. सदर ऑनलाइन फॉर्म भरून मिळालेल्या पावतीवर सही करण्यासाठी, अर्जदार यांच्या घरी भेट देण्यासाठी, व फॉर्म मध्ये माहिती भरून देण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांचेकडे २० फेब्रुवारी रोजी ७०० रुपये लाचेची पंचांसमक्ष मागणी करून तडजोडी अंती ती स्वीकारली. यावेळेस एसीबीने लाच घेणा-या कर्मचा-याला रंगेहाथ पकडले. त्याच्या विरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, सन १९८८ चे कलम ७ प्रमाणे येवला शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल कामकाज सुरु आहे.
*सापळा कारवाई
*युनिट -* ला.प्र.वि. नाशिक
तक्रारदार- पुरुष, 43 वर्ष.
आलोसे – अनिल भास्कर आव्हाड वय- 42 वर्षे, व्यवसाय-नोकरी (वीज तंत्रज्ञ बाह्यश्रोत), म.रा.वि.वि. येवला कक्ष, ता.येवला, जि.नाशिक रा. राजापूर तालुका-येवला, जिल्हा-नाशिक
*लाचेची मागणी- दिनांक 20/02/2024 रोजी 700/-रु. .
*लाच स्वीकारली – दिनांक 20/02/2024 रोजी 700/-रु.
*लाचेचे कारण – यातील तक्रारदार यांचे नातेवाईक यांनी त्यांच्या घरी नवीन वीज मीटर बसविण्यासाठी म.रा.वि.वि. येवला कक्ष, येवला येथे ऑनलाइन अर्ज केला होता. सदर ऑनलाइन फॉर्म भरून मिळालेल्या पावतीवर सही करण्यासाठी, अर्जदार यांच्या घरी भेट देण्यासाठी, व फॉर्म मध्ये माहिती भरून देण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांचेकडे दि.20/02/2024 रोजी 700/-रु. लाचेची पंचांसमक्ष मागणी करून तडजोडी अंती दी.20/02/2024 रोजी 700/-रु. लाचेची रक्कम स्वीकारली त्यांना असता रंगेहाथ पकडण्यात आले आहे. आलोसे यांचेविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, सन १९८८ चे कलम ७ प्रमाणे येवला शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल कामकाज सुरु आहे.
*सापळा अधिकारी – श्री नितीन पाटील, पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक
*सापळा पथक – पोना/विनोद चौधरी, म.पोना/ शितल सूर्यवंशी, सर्व नेमणूक ला.प्र.वि. नाशिक