नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंचवटीत महिलेच्या अंगावर रॅाकेल टाकून तिला पेटवून तीला ठार मारणारा आरोपी गुलाबराव माचेवाल (कुमावत) (४३) याला जिल्हा व सत्र न्यायालयाने आजन्म कारावास व ६० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. सदरचा गुन्हा नाशिक पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील पंचवटी पोलीस ठाणे हददीत १० ऑगस्ट २०२१ रोजी पंचवटी येथील भाविन बेला, शिंदेनगर येथे घडला होता.
या घटनेबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी सुशीला गौंड व त्यांनी बहिण भारती गौंड हे वेगवेगळया फ्लॅटमध्ये रहात होते. फिर्यादीची बहीण भारती आनंद गौंड ही फिर्यादी सुशिला ओमप्रकाश गौंड यांचे फ्लॅटवर पाणी घेणेसाठी आली असता, त्यांचे ओळखीचा सदर गुन्हयातील आरोपी सुखदेव गुलाबराव माचेवाल (कुमावत) वय ४३ वर्षे, रा.घ.नं.४७ कुमावतनगर पंचवटी नाशिक याने भारती आनंद गौंड यांना चापट मारून माझे सोबत खाली चल असे म्हणाला त्यांस तिने नकार दिला. त्यानंतर तिला शिवीगाळ व धक्काबुक्की करीत त्याचे जवळील रॉकेल सारखा वास येणार निळसर द्रवाची बाटलीतील द्रव तिचे अंगावर ओतून तिला आगपेटीने पेटवून पळून गेला. सदरची आग विझविणेसाठी फिर्यादी गेले असता, त्यांचे देखील दोन्ही हात व पाय भाजले. तसेच त्यांची बहीण भारती आनंद गौंड हीचे संपूर्ण शरीर भाजून तिला गंभीर दुःखापत केली तिचेवर सिव्हील हॉस्पीटल नाशिक येथे उपचार चालू असतांना मयत झाली. आरोपी याने भारती आनंद गौंड हीस जिवे ठार मारले म्हणुन आरोपीविरूध्द पंचवटी पोलीस ठाणे येथे भा.दं. वि. कलम ३०२,३०७,३२३,५०४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर गुन्हयाचा तपास तत्कालिन सहा. पोलीस निरीक्षक एस.बी. चोपडे, पोलिस एन.व्ही. आहेर यांनी केला.
या आरोपीविरूध्द् सबळ पुरावे न्यायालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर या खटल्याची सुनावणी होऊन आज आरोपींविरूध्द् प्रथम जिल्हा व सत्र न्यायलायाचे न्यायदंडाधिकारी पी.व्ही. घुले यांनी शिक्षा सुनावणी. सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता म्हणून श्रीमती लिना चव्हाण यांनी कामकाज पाहिले