इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
चंदीगडः महापौर निवडणुकीच्या प्रकरणात ‘आम आदमी पक्षा’ला सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक निर्णय अधिका-यांचा निर्णय रद्द करत आपचे उमेदवार कुलदीप कुमार यांना विजयी घोषित केले आहे. त्यानंतर कोर्टाने निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे. या निर्णयानंतर आम आदमी पार्टीने ही लोकशाहीचा विजय असल्याचे सांगितले.
विशेष म्हणजे ‘आप’चे तीन नगरसेवक भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर हा भाजपला धक्का देणारा निकाल आला आहे. भाजपकडे १४ ऐवजी १७ नगरसेवक झाले असले तरी महापौर आता आपचा राहणार आहे.
भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित महापौर मनोज सोनकर यांनी ही निर्णय़ येण्याअगदोर राजीनामा दिला होता. या निवडणुकीत आप व काँग्रेसने युती करुन आघाडी केली होती. पण, निवडणुक निर्णय अधिकारी यांनी गडबड करत भाजपच्या उमेदवाराला विजयी घोषित केले. त्याचा व्हिडिओ देशभर चर्चेचा ठरला. त्यानंतर आपने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली व येथे त्यांना दिलासा मिळाला.
या निर्णयानंतर दिल्लीचे मुख्यमत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेतली…..