पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्थामार्फत शासकीय सहकार व लेखा पदविका परीक्षा (जी.डी.सी. ॲण्ड ए) व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन (सी.एच.एम.) परीक्षा राज्यातील १६ परीक्षा केंद्रावर २४, २५ व २६ मे रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती जी.डी.सी. ॲण्ड ए बोर्डाचे सचिव तथा सहकारी संस्था उपनिबंधकांनी (प.व प्र.) दिली आहे.
ही परीक्षा मुंबई, ठाणे, नाशिक, जळगाव, अहमदनगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, लातूर, अकोला, अमरावती, नागपूर व चंद्रपूर या केंद्रावर घेण्यात येणार आहे.
जी.डी.सी. ॲण्ड ए व सी.एच.एम. परीक्षा-२०२४ साठी https://gdca.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत २५ फेब्रुवारीपर्यंत तसेच बँकेत चलनाने भरणा करण्याची मुदत २९ फेब्रुवारीपर्यंत वाढविण्यात आली असल्याचेही कळविण्यात आले आहे.