नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबई – आग्रा महामार्गावर वाडिव-हे जवळ आज आल्टो कारचे टायर फुटल्याने अपघात झाला. या कारचे टायर फुटल्यानंतर गाडीने दोन पलट्या घेतल्या. त्यात दोन जण जखमी झाले आहे. नाशिककडून ही कार घोटीकडे जात होती. या अपघातात घोटी येथील परेज मणियार (२८), अश्पाक तांबोळी (३०) हे जखमी झाले आहे.
दुपारी साडेतीनच्या आसपास हा अपघात झाला. या अपघाताची माहिती फोनवर मिळताच गोंदे फाटा स्पॅाटवर उभी असलेली जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानची मोफत अॅम्बुलन्स लगेचच अपघात स्थळी पोहोचली.
त्यानंतर जखमींना घोटी समर्थ सह्याद्री हॉस्पिटलला दाखल केले. या अपघातात आल्टो कार MH.12.CK.0441 चे नुकसान झाले आहे. गाडी पटली झाल्यानंतर समोरुन वाहन जर वेगाने आले असते तर मोठा अपघात झाला असता. या रस्त्यावर रोज वाहनांचे अपघात होत असल्यामुळे सुरक्षेततेचे उपाय वाढवण्याची गरज आहे.