नांदगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तब्बल ४० दिवस उलटूनही नांदगाव शहरालगत असलेल्या मल्हारवाडी गावाला पाणीपुरवठा न झाल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी नांदगाव – येवला रस्त्यावर ठिय्या मांडत रास्ता – रोको आंदोलन केले.
नांदगाव नगरपरिषद मल्हारवाडी गावाला पाणीपुरवठा करतांना सापत्न पणाची वागणूक देत असल्याचा आरोप यावेळी ग्रामस्थांनी केला. दरम्यान, नांदगाव शहर व परिसराला करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्याची पाईपलाईन सातत्याने नादुरुस्त होत असल्याने पाणीपुरवठा करण्यास विलंब होत असल्याची हतबलता नगरपरिषद प्रशासनाने व्यक्त केली.
या आंदोलनानंतर पाईपलाईन दुरुस्त झाल्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतर पोलिसांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे घेण्यात आले..