इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईः राज्यातील शाळकरी मुलांमधील कुषोषणाचे आणि अॅनिमियाचे प्रमाण कमी करण्यासाठी कुपोषित मुलांना मोहाच्या फुलांपासून बनवलेले लाडू देण्यात येणार आहेत. राज्य सरकारने तसा निर्णय घेतला आहे.
पौष्टिक आहाराचा अभाव आणि कुपोषणामुळे राज्यातील लहान मुले आणि किशोरवयीन मुलांमध्ये अॅनिमियाचे प्रमाण वाढत आहे. कुपोषण आणि ॲनिमियाला आळा घालण्यासाठी जिल्हानिहाय आढावा बैठकीत घेण्यात आला. या पौष्टिक आहारामुळे शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढून अॅनिमियाचे प्रमाण कमी होईल, असे कृती दलाला वाटते. राज्याच्या आरोग्य विभागाकडून मुलांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. त्यात अठरा वर्षापर्यंतच्या सत्तर हजारांहून अधिक बालके आणि किशोरवयीन मुलांमध्ये अशक्तपणा आढळून आला. राज्यातील प्रत्येक महिला अॅनिमियाग्रस्त आहे.
अॅनिमियाग्रस्तांना लोहाच्या गोळ्या दिल्या जात होत्या; परंतु कुपोषणमुक्त कृती दलाचे अध्यक्ष डॉ. दीपक सावंत यांनी मोहाच्या फुलांचे लाडू देण्याची सूचना केली आहे. मोहाच्या फुलातून व्हिटॅमिन सी, प्रथिने, लोह, कॅल्शियम, फॉस्फरस आणि कार्बोहायड्रेट मिळतात. त्यामुळे हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते.