इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्लीः अगोदरच कमकुवत असलेल्या विरोधी पक्षाला आता खिंडार पाडण्यासाठी भाजने रणनिती आखली असून त्यात देशभरातील काँग्रेसचे तब्बल १२ खासदार, ४० आमदार आणि इतर महत्त्वाच्या नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. भाजपने विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली त्यासाठी एक समिती तयार करण्यात आली आहे. ही समिती अन्य पक्षातील नेत्यांना भाजपत आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. पुढील दोन आठवड्यात त्यांचा भाजपात प्रवेश होऊ शकतो.
भाजपने या लोकसभा निवडणुकीत ३७० जागा जिंकण्याचे टार्गेट ठेवले असून त्यासाठी काहीही करायची भाजपची तयारी आहे. महाराष्ट्रात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपत प्रवेश केला. चंदीगडमध्ये ‘आप’तीन नगरसेवकांनी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश केला आहे. राजस्थानमध्ये काँग्रेसचे आमदार महेंदरजीत मालवीय हाती कमळ घेतले आहे. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ आणि त्यांचे चिरंजीव खासदार नकुलनाथ यांच्यासह काँग्रेसचे २२ आमदारही भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.
महाराष्ट्र, आसाम, उत्तर प्रदेश, जम्मू काश्मीर, मध्य प्रदेशमधील जास्तीत जास्त जागांवर भाजपचे लक्ष असून, भाजपला येथे जास्त जागा जिंकायच्या आहेत. २०१९ मध्ये जिंकलेल्या जागापेक्षा आणखी २५ पेक्षा जास्त जागा भाजपला या राज्यातून जिंकायच्या आहेत. इतर पक्षातील मतब्बर आणि दिग्गज नेते भाजपत आले तर पंजाब, पश्चिम बंगाल, ओडिशा, कर्नाटक, झारखंड आणि इतर काही राज्यात भाजपच्या दहा जागा वाढू शकतात.