नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एकलहरे रोडवरील खुनाच्या गुन्हयाचा उलगडा झाला आहे. यातील अज्ञात मृत व्यक्तींची ओळख पटल्यानंतर दोन जणांना पोलिसांनी गजाआड केले आहे. ही कामगिरी गुन्हे शाखा युनिट 1 ने केली आहे. नाशिकरोड पोलीस स्टेशन येथे हा खूनाचा गुन्हा दाखल झाला होता.
पोलीस उप आयुक्त गुन्हे व सहा पोलीस आयुक्त गुन्हे यांनी सदर गुन्हा उघडकीस आणणे बाबत व अज्ञात आरोपी यांचा शोध घेऊन कारवाई करणे बाबत वेळोवेळी मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या. सदर गुन्ह्याचा गुन्हे शाखा युनिट 1 चे पोलीस अधिकारी व अमलदार समांतर तपास करीत होते. सदर गुन्हा मधील अज्ञात इसमाचा ओळख पटवणे हे महत्त्वाचे काम होते सदर अज्ञात इसमाचे ओळख पटवून मयत हा चेतन आनंदा ठमके असल्याबाबत निष्पन्न केले.
सदर गुन्हयामधील अज्ञात आरोपीतांचा शोध घेऊन त्यांचे नाव व पत्ता पोलिसांनी मिळवले. त्यानंतर युनिट एकचे पोलीस अधिकारी व अमलदार आरोपितांचा शोध घेत असताना पोलीस आमदार आप्पा पानवळ व मुक्तार शेख यांना गुप्त माहिती मिळाली की यातील आरोपी चेतन आहेर व आशिष भारद्वाज हे एका पांढऱ्या रंगाच्या एक्टिवा गाडीवर सातपूर परिसरामध्ये येणार आहे. ही माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी सातपुर येथील श्रमिक नगर येथून पंकज विनोद आहेर (२५) रा. शिवकृपा स्वीट च्या समोर,महाकाली चौक, त्रिमूर्ती नगर, सिडको,अंबड,नाशिक व
आशिष रामचंद्र भारद्वाज (२३) दोन्ही रा. शुभम पार्क,अंबड नाशिक यांना ताब्यात घेतले. त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली असून त्याचे ताब्यातून गुन्हामध्ये वापरलेली अॅक्टिवा गाडी व गुन्हातील हत्यार लोखंडी कोयता असा एकूण ५० हजार ५०० रुपयाचा किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. दोन्ही आरोपी यांना पुढील कारवाईसाठी नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.