इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
येवला- मराठा आरक्षणप्रश्नी राज्यव्यापी जनजागृती मोहिमेवर असलेल्या मनोज जरांगे – पाटील यांच्या सोमवारी झालेल्या सभेसाठी फुलांचा वर्षाव करण्यासाठी लावण्यात आलेल्या एका जेसीबी मधून ४ कार्यकर्ते खाली पडले होते. याच अपघातात विलास गाढे हे सुध्दा जखमी झाले होते. त्यांच्यावर सध्या अपोलो रुग्णालयात उपचार सुरू आहे. आज राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी रुग्णालयात विलास गाढे व त्यांच्या कुटबियांची भेट घेतली. यावेळी तब्येतीची विचारपुस केली. तसेच उपचार करणाऱ्या डॉक्टरांशी सविस्तर चर्चा केली.
यावेळी शहराध्यक्ष रंजन ठाकरे, प्रदेश पदाधिकारी दिलीप खैरे, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, समाधान जेजुरकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. येवल्यात जरांगे पाटील यांची पहिल्यांदा जाहीर सभा असल्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. त्यासाठी जोरदार स्वागत करण्यासाठी २० जेसीबीतून फुलांचा वर्षाव करण्यात आला.
पण, एका जेसीबीतून ४ कार्यकर्ते खाली पडले. त्यातील विलास गाढे हे एक होते. त्यांची आज विचारपुस करण्यासाठी भुजबळ अपोलो हॅास्टिलमध्ये गेले. येवला हा भुजबळ यांचा विधानसभा मतदार संघ असल्यामुळे त्यांच्याच मतदार संघातील विलास गाढे हे आहेत.