नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक विभागात उपसंचालक, पर्यटन संचालनालय, नाशिक यांचेमार्फत नाशिक मध्ये शेतकऱ्यांना व्यासपीठ देण्यासह द्राक्ष उद्योगांना चालना देण्यासाठी तसेच नाशिकची प्रसिध्दी व प्रचार करणेसाठी शनिवार व रविवार २४ व २५ फेब्रुवारी रोजी नाशिक मध्ये मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या हॉटेल एमराल्ड पार्क ( ग्रीन व्हियू हॉटेल) येथे दुसरा नाशिक ग्रेप हार्वेस्ट फेस्टिवल २०२४ होणार असून त्याद्वारे ताजी द्राक्ष खरेदी करण्यासह, द्राक्ष बागांना भेटी तसेच द्राक्षाचा विविध जाती बघण्याची संधी तसेच नाशिक मधील काही प्रसिद्ध वायनरीना भेट देता येणार आहे.
ग्रेप हार्वेस्ट महोत्सवात द्राक्ष शेती, द्राक्ष हार्वेस्टिंग (काढणी), द्राक्षाच्या विविध जाती, आधुनिक पद्धतीने द्राक्ष व्यवस्थापन तसेच पॅकेजिंग बघता येणार आहे, तसेच द्राक्षावर प्रोसेसिंग करून तयार केलेले विविध पेय, पदार्थ तसेच वाईन टेस्ट घेण्याची संधी भेटणार आहे. तसेच द्राक्ष खरेदी सह आकर्षक खेळ आणि लाईव्ह म्युझिक कॉन्सर्टची व विविध खाद्य चाखण्याची पर्वणी नाशिककरांसाठी उपलब्ध होणार आहे.
यावर्षी सलग दुस-यांदा पर्यटन संचालनालयामार्फत हा महोत्सव होत असल्यामुळे नाशिककरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या महोत्सवाला मिळत आहे. नाशिक मधील प्रसिद्ध द्राक्षांचे ब्रडिंग करण्यास कृषी पर्यटनास चालना देण्यासाठी नाशिक द्राक्ष पर्यटन महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. जास्तीत जास्त संख्येने या फेस्टिवल मध्ये सहभागी होऊन उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवावा असे आवाहन पर्यटन संचानालयच्या उपसंचालक मधुमती सरदेसाई – राठोड यांनी केले आहे.
महोत्सव ठिकाण – हॉटेल एमराल्ड पार्क
दिनांक – २४ व २५ फेब्रुवारी २०२४
वेळ – सकाळी ११ ते रात्री ९ पर्यंत
आयोजित कार्यक्रम – द्राक्ष प्रदर्शन, द्राक्ष मार्केट, बेस्ट द्राक्ष स्पर्धा, वाईन आणि डाइन प्रदर्शन, लाईव्ह म्युझिक कॉन्सर्ट, सांस्कृतिक कार्यक्रम आणि बरेच काही
एक्सप्लोर नाशिक ग्रेप हार्वेस्ट टूर (सहल)
टूर नंबर १ – दिनांक २४ फेब्रुवारी २०२४
हॉटेल एमराल्ड पार्क (एकत्रीकरण) सुरूवात स. ८ वाजता बसवंत हनी बी पार्क (निसर्ग उत्सव), लोणवाडी – चोपडे ग्रेप पॅकिंग हाऊस, निफा वायनरी टूर (कृषी पर्यटन केंद्र / हार्वेस्टिंग) वाईन आणि डाइन प्रदर्शन येथे
टूर नंबर २ – दिनांक २५ फेब्रुवारी २०२४
हॉटेल एमराल्ड पार्क (एकत्रीकरण) सुरूवात स. ८ वाजता सहयाद्री फार्म (फार्मर प्रोड्युसर कंपनी)- ऍग्रो प्रोसेसिंग युनिट – मोएत शेंबेन विनयार्ड टूर वाईन आणि डाइन प्रदर्शन हॉटेल एमराल्ड पार्क येथे
महोत्सवासंबंधी अधिक माहितीसाठी खालील नंबर वर संपर्क साधावा. ९८९००१११२०,,९८९०४०४२५३, ९८२२४३९०५१ ईमेल – ddtourism.nashik-mh@gov.in, वेबसाईट www.maharashtratourism.gov.in