नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अंबड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अशोक नजन (४०) यांनी मंगळवारी सकाळी १० वाजता स्वत:च्या पिस्तूल मधून डोक्यात गोळी मारुन आत्महत्या केली. गोळी मारल्यानंतर त्यांचा जागीच मृत्यू झाला.
ते सकाळी घरातून पोलिस ठाण्यात आले. त्यानंतर ते कॅबीनमध्ये गेले. त्यानंतर त्यांनी आत्महत्या केली. त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण,
यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिका-यांनी धाव घेतली.