नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी प्राधिकरण (आयइपीएफए) आणि आशिया आणि आग्नेय आशियामधील प्रमुख वित्तीय संस्था – डीबीएस बँक यांच्यात सामंजस्य करारावर आज नवी दिल्लीत स्वाक्षरी करण्यात आली.
या करारानुसार, डीबीएस बँकेचे उद्दिष्ट विविध डिजिटल मंचाद्वारे सुरक्षा संदेश प्रसारित करून आयईपीएफएच्या गुंतवणूकदारांमध्ये जागरूकता निर्माण करणा-या उपक्रमांना पाठिंबा देणे आहे. डीबीएस बँकेच्या देशामध्ये 19 राज्यांमध्ये शाखा आहेत तसेच एटीएमचे विस्तृत जाळे आहे. बॅंकेने डिजिटल पायाभूत सुविधा पुरवल्या आहेत. त्यांच्या माध्यमातून ‘आयइपीएफए’च्या गुंतवणूकदार जागरूकता आणि अंतिम वापरकर्त्यांपर्यंत संरक्षण संदेश पोहोचविण्याचे काम चांगल्या पद्धतीने आणि मोठ्या प्रमाणावर करणे शक्य होणार आहे.
आयइपीएफए च्या गुंतवणूकदार जागरूकता कार्यक्रमांमध्ये नागरिकांचा सहभाग आणि पोहोच वाढवी आणि प्रतिबद्धता सुनिश्चित करण्यासाठी डीबीएस बँक आपल्या विविध डिजिटल मंचाचा वापर करणार आहे. यामध्ये बँकिंग व्यवहारादरम्यान ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी एटीएम स्क्रीनवर सुरक्षा संदेश प्रदर्शित करणे आणि तसेच ऑनलाइन व्यवहार केले जात असताना सुरक्षितता संदेश ठळक वैशिष्ट्यांसह प्रसारित करणे. व्हॉट्सॲप आणि इतर संदेश पद्धतीने डीबीएस बँकेच्या शाखांमधील डिजिटल स्क्रीनवर ते संदेश दाखवणे. अधिकाधिक ग्राहकांशी संपर्क साधण्यासाठी, आणि डीबीएस बँकेच्या समाज माध्यमांच्या खात्यांवर सुरक्षा संदेश पोस्ट करण्यात येणार आहेत.
यापूर्वी, ‘आयइपीएफए’ने बँक ऑफ बडोदा आणि आयसीआयसीआय बँकेबरोबर अशा प्रकारचे सामंजस्य करार केले आहेत. ‘आयइपीएफए’ने स्थापनेपासून, आर्थिक साक्षरता वाढवणे आणि आर्थिक फसवणुकीपासून लोकांचे संरक्षण व्हावे यासाठी गुंतवणूकदारांना सक्षम करणे या उद्देशाने अनेक गुंतवणूकदार जागरूकता कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.