नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सर्व व्यावसायिकांना एकाच छताखाली आणून नाशिक बिझिनेस असोसिएशन नाशिकची खरी ओळख निर्माण करीत असल्याचे प्रतिपादन प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक जितेंद्र ठक्कर यांनी व्यक्त केले. नाशिक बिझनेस असोसिएशन आयोजित, क्रेडाई – नरेडको सदस्य यांच्या संयुक्त उपस्थितीत ‘व्हिजन नाशिक 2030 ‘ या विषयावर हॉटेल रॅडीसन ब्ल्यू येथे चर्चासत्र पार पाडले.
प्रमुख अतिथी म्हणून दिपक बागड, सुनिल गवांदे, सुजॉय गुप्ता, कृणाल पाटील, शंतनु देशपांडे, प्रकाश चौधरी, विजय सानप आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचा शुभारंभ माती पूजनाने पार पडला. कार्यक्रमाचे प्रास्तविक एनबीएचे अध्यक्ष विक्रम खैरनार यांनी केले. परिचय मधुरा कुंभेजकर यांनी तर सूत्रसंचालन मकरंद देशपांडे यानी व आभार बाळासाहेब आंबरे यांनी मानले.
या प्रसंगी नाशिकमधील १५० बांधकाम व्यावसायिक व एनबीए चे सदस्य उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी वैशाखी सोनार, नितीन राका, दिलीप रंगारी, संदीप सोनवणे, ज्ञानेश्वर धामणे, आर्की. योगेश धामणे, राजेंद्र कोतकर, भुषण महाजन, वैभव आव्हाड, जगदीश शास्त्री, आशिष सिनकर, रवींद्र आवळे यांनी परिश्रम घेतले.