मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे क्रीडा भवन येथे शिवजयंतीनिमित्त एका सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी महानगरपालिकेच्या संगीत विभागातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील पोवाडा तसेच देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी राज्यपालांनी पालिकेच्या संगीत विभागाला २५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले.
या कार्यक्रमाला पालिकेचे प्रशासक डॉ. इक्बाल सिंह चहल, अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहरे) डॉ. अश्विनी जोशी, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष किशन जाधव तसेच महानगरपालिकेचे कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.








